Vaishnavi Hagawane Death Case : "मोक्का लावण्यासाठी काही..."; वैष्णवी हगवणे प्रकरणी सीएम फडणवीसांनी स्पष्टच सांगितले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 12:06 IST2025-05-23T12:04:57+5:302025-05-23T12:06:54+5:30
Vaishnavi Hagawane Death Case : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले असून या प्रकरणी मोक्का लावण्याकरीता ते नियमात बसते का पाहावे लागेल असं सांगितले.

Vaishnavi Hagawane Death Case : "मोक्का लावण्यासाठी काही..."; वैष्णवी हगवणे प्रकरणी सीएम फडणवीसांनी स्पष्टच सांगितले
Vaishnavi Hagawane Death Case : पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी राज्यभर खळबळ उडाली आहे. या प्रकरणात वैष्णवीचा पती, सासू आणि नणंद यांना आधीच अटक केली होती. पण सासरा आणि दीर फरार होते. दरम्यान, फरार असलेल्या राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांना पोलिसांनी पहाटे अटक केली. या प्रकरणावर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यू प्रकरणी कडक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सीएम फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आज सकाळीच अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य कारवाई केली आहे. हे प्रकरण तडीस जाईपर्यंत जे काही करता येईल त्या गोष्टी पोलिस करतील.
"अशा प्रकारे आत्महत्येला प्रवृत्त करणं अशा गोष्टी सहन करणार नाही. कायद्याने जी काही कडक कारवाई करता येईल ती केली जाईल. मकोका लावण्याकरता त्यासाठी काही नियम आहेत. त्या नियमात बसले तर मकोका लागू शकेल. पण, नियमात बसेल की नाही हे आज सांगू शकत नाही, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
याप्रकरणी अजित पवार गंभीर आहेत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, २१ व्या शतकातही मुली आणि सुनांमध्ये फरक करणे फार चुकीचे आहे. त्यांना अशा प्रकारची वागणूक देणे हे पाप आहे. याप्रकरणी अजित पवार गंभीर नाहीत असे नाही. त्यांचा सांगण्याचा उद्देश एवढाच होता की, कोणी जर बोलवलं तर आपण जातो, पण पुढे काय घडणार याची कल्पना नसते एवढा सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
वैष्णवी हगवणे यांच्या फरार सासऱ्याला अटक
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी असलेल्या फरार सासऱ्याला राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अखेर सातव्या दिवशी पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना आज (गुरुवार) पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास एक सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणात वैष्णवीच्या सासू, पती आणि नणंद यांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या तपासानंतर उघड झालेल्या अनेक धक्कादायक बाबींमुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे.