शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

दारू दुकानातील कर्मचाऱ्यांचे लसीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:24 IST

कोल्हापूर : आम्ही शासनाला एवढा महसूल मिळवून देतो तेव्हा आमच्या दारू दुकानातील ...

कोल्हापूर : आम्ही शासनाला एवढा महसूल मिळवून देतो तेव्हा आमच्या दारू दुकानातील कर्मचाऱ्यांचे प्राधान्यक्रमाने लसीकरण करून द्या, अशी मागणी शहरातील वाईन शॉपच्या मालकाने केली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्याकडे लेखी मागणी करताच उपस्थितांना डोक्यावर हात मारण्याची वेळ आली.

जिल्हाधिकारी आणि उत्पादन शुल्क विभागाने घरपोच करण्याबाबत ज्या सूचना केल्या आहेत त्यामध्ये संबंधितांचे लसीकरण करणे आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. संबंधित वाईन शॉपमालक या पत्रांच्या झेरॉक्स घेऊन संजयसिंह चव्हाण यांना भेटण्यासाठी आले. माझ्या दुकानात सात, आठ कर्मचारी आहेत; परंतु ते आता येण्यास तयार नाहीत. त्यामुळे प्राधान्यक्रमाने या कर्मचाऱ्यांना लस मिळावी अशी त्यांची मागणी होती. त्यांच्या या मागणीमुळे उपस्थितही अवाक्‌ झाले.

‘अत्यावश्यक सेवे’मध्ये तुमचा विभाग येत नसल्यामुळे तुमच्या कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी नोंदणी करावी लागेल आणि रांगेमध्ये उभे राहूनच लस घ्यावी लागेल, असे चव्हाण यांनी स्पष्ट केल्यानंतर मग संबंधित मालक निघून गेले.