शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कारवाई टाळण्यासाठी ‘दिखाऊ’ हेल्मेटचा वापर

By admin | Updated: June 21, 2017 00:57 IST

दुचाकीधारकांचा फंडा : थोड्या रकमेसाठी जीव धोक्यात घालून काहींचा प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : विना हेल्मेट दुुचाकी चालविणाऱ्यांविरोधात कोल्हापूरमध्ये पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. या कारवाईतील पाचशे रुपयांचा दंड टाळण्यासाठी वाहनधारकांकडून दिखाऊ स्वरूपातील हेल्मेटचा वापर सुरू आहे. अशा हेल्मेटमुळे जीव धोक्यात घालून काहींचा प्रवास सुरू आहे. महामार्गावर वाहनधारकांना हेल्मेटचा वापर बंधनकारक केला आहे. जे वाहनधारक विना हेल्मेट असतील, त्यांना पाचशे रुपयांचा दंड करण्यात येत आहे. पोलिसांनी ही कारवाई कडक केली आहे. त्यामुळे अशा कारवाईतून वाचण्यासाठी अनेक दुचाकीधारकांकडून हेल्मेट खरेदीची धावपळ सुरू आहे. यांतील काहीजण सुरक्षित आणि चांगल्या दर्जाच्या हेल्मेटला प्राधान्य देत आहेत. मात्र, काही वाहनधारकांकडून बाजारात उपलब्ध असलेल्या आणि आयएसआय मार्क नसलेल्या केवळ दिखाऊ स्वरूपातील हेल्मेटचा वापर केला जात आहे. शहर आणि शहरालगतच्या महामार्गांवर ठिकठिकाणी अशा दिखाऊ हेल्मेटची विक्री सुरू आहे. यात हाफ अँड विथ ग्लास, कॅप आणि फुल या प्रकारात हेल्मेट उपलब्ध आहेत. यातील फुल हेल्मेट ही ३५० ते ४००, हाफ अँड विथ ग्लास हे ३५०, तर कॅपची किंमत २०० ते ३०० रुपये इतकी आहे. यातील बहुतांश हेल्मेट बघताच ती केवळ दिखाऊ असल्याचे स्पष्ट होते. यात सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक घटकांचा समावेश नाही. हेल्मेटची मागणी, ग्राहकांची गरज आणि आर्थिक स्थिती लक्षात घेऊन विक्रेत्यांनी विविध स्वरूपांतील हेल्मेट बाजारपेठेत उपलब्ध करून दिली आहेत. सध्या दिल्ली आणि चेन्नई येथून हेल्मेट विक्रीसाठी कोल्हापुरात येत आहेत. विना हेल्मेट प्रवास करून दंड भरण्यापेक्षा तीनशे रुपयांपर्यंतचे अशा स्वरूपातील हेल्मेट घेण्याचा पर्याय अनेकांनी निवडला आहे. मात्र, ते या पर्यायातून स्वत:चा जीव धोक्यात टाकत आहेत.