शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: ५ राज्यांमध्ये 'सत्ता'धीश कोण?, आज होणार फैसला; पश्चिम बंगालकडे सगळ्यांचे लक्ष
2
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
3
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
4
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
5
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
6
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
7
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
8
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
9
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
10
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
11
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
12
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
13
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
14
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
15
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
16
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
17
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
18
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
19
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
20
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
Daily Top 2Weekly Top 5

तुकडीस वाढीव ४० टक्के प्रवेश देण्यास विद्यापीठाने मान्यता द्यावी

By admin | Updated: July 5, 2016 00:09 IST

अतिरिक्त विद्यार्थांचा प्रश्न : प्राचार्य, संस्थाचालकांची मागणी

कोल्हापूर : पदवी प्रथम वर्षाच्या अतिरिक्त विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न सोडविण्यासाठी एका तुकडीला ४० टक्के क्षमता वाढवून द्या, अशी मागणी प्राचार्य, संस्थाचालकांनी शिवाजी विद्यापीठाकडे सोमवारी केली. याबाबत त्यांनी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, बीसीयुडी संचालक डॉ. डी. आर. मोरे यांच्याशी चर्चा केली.पदवीच्या प्रथम वर्षातील अतिरिक्त विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या प्रश्नाबाबत विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृहात कुलगुरू डॉ. शिंदे व बीसीयुडी संचालक डॉ. मोरे व शिवाजी विद्यापीठ प्राचार्य असोसिएशन व संस्थाचालकांची बैठक झाली. त्यात प्राचार्य असोसिएशनचे अध्यक्ष प्रा. डॉ. क्रांतिकुमार पाटील, संस्थाचालक भैया माने, प्रा. किसन कुराडे, आदींनी अतिरिक्त विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबतची स्थिती सांगितली. तसेच अतिरिक्त विद्यार्थ्यांकडून प्रवेशाबाबत वारंवार विचारणा होत आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी पर्याय म्हणून सध्या महाविद्यालयांमधील कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखानिहाय एका तुकडीला ४० टक्के वाढीव प्रवेश देण्यास मान्यता देण्याची मागणी केली, तसेच ज्या महाविद्यालयांनी अतिरिक्त तुकडीची मागणी केली आहे, त्याला तत्काळ मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी प्राचार्य, संस्थाचालकांनी केली. त्यावर अतिरिक्त तुकडीची मागणी करणाऱ्या प्रस्तावाला शासनाकडून लवकरच मान्यता मिळेल. एका तुकडीला वाढीव ४० टक्के प्रवेश क्षमता वाढवून हवी आहे. त्यांनी याबाबतचे प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन कुलगुरू डॉ. शिंदे यांनी केले. या प्रस्तावांचा विचार करून त्याला मान्यता देण्याची कार्यवाही केली जाईल, असे डॉ. मोरे यांनी सांगितले. बैठकीस प्राचार्य बी. एन. पवार, सी. आर. गोडसे, सतीश घाळी, पी. जी. पाटील, एस. बी. पाटील, प्रवीण चौगुले, आदींसह विविध महाविद्यालयांचे संस्थाचालक, प्राचार्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)