पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढविरोधी ‘राष्ट्रवादी’चे अनोखे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:21 IST2021-02-08T04:21:51+5:302021-02-08T04:21:51+5:30

कोल्हापूर : केंद्राने केलेल्या अन्यायी पेट्रोल-डिझेल व स्वयंपाक गॅसच्या दरवाढीविरोधात कोल्हापूर दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने राजारामपुरी माऊली पुतळा येथे ...

Unique movement of ‘Nationalists’ against petrol-diesel, gas price hike | पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढविरोधी ‘राष्ट्रवादी’चे अनोखे आंदोलन

पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढविरोधी ‘राष्ट्रवादी’चे अनोखे आंदोलन

कोल्हापूर : केंद्राने केलेल्या अन्यायी पेट्रोल-डिझेल व स्वयंपाक गॅसच्या दरवाढीविरोधात कोल्हापूर दक्षिण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने राजारामपुरी माऊली पुतळा येथे अनोखे आंदोलन करून महागाईविरोधात लक्ष वेधले. आंदोलकांनी दुचाकी, स्वयंपाक गॅस बैलगाडीत ठेवून केंद्र शासनाच्याविरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या.

वाढत्या महागाईविरोधात चक्क बैलगाडीत जीवनावश्यक वस्तूंसह दुचाकी, गॅस ठेवून आंदोलकांनी राजारामपुरी भागातून निषेध फेरी काढली. आंदोलनात महिलांचाही मोठा सहभाग होता. अध्यक्ष नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात पीटर चौधरी, फिरोज सौदागर, निरंजन कदम, सुरेश माने, नागेश शिंदे, सम्राट गोंधळी, सुनीता कांबरे, तमन्ना शेख, मुमताज बंधुवाले, संपदा काळे आदींचा सहभाग होता.

फोटो नं. ०७०२२०२१-कोल-आंदोलन पेट्रोल

ओळ :

पेट्रोल-डिझेल व स्वयंपाक गॅस दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने केंद्र शासनाच्या निषेधार्थ राजारामपुरी भागात अनोखी रॅली काढली.

Web Title: Unique movement of ‘Nationalists’ against petrol-diesel, gas price hike