शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव एसटीच्या धडकेत बालकाचा दुर्दैवी मृत्यू

By admin | Updated: March 6, 2015 01:18 IST

आजी-आजोबा किरकोळ जखमी : रजपूतवाडी फाटा येथे अपघात

कोल्हापूर : कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्यावर रजपूतवाडी फाटा येथे गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास भरधाव एस.टी. बसने मोपेडला पाठीमागून धडक दिल्याने आजी-आजोबांसोबत पन्हाळ्याला नातेवाइकांकडे निघालेल्या पाच वर्षांच्या बालकाचा डोक्याला गंभीर दुखापत होऊन दुर्दैवी मृत्यू झाला. सुफियान सादिक जहाँगीर (रा. कुडची, ता. रायबाग, जि. बेळगाव) असे त्याचे नाव आहे. त्याचे आजी-आजोबा यास्मीन सलीम काझी (वय ५०, रा. कात्यायनी पार्क, कळंबा) व सलीम बापूलाल काझी (५५) हे किरकोळ जखमी झाले. याबाबत पोलिसांनी सांगितले, यास्मीन काझी व त्यांचे पती सलीम काझी यांच्या मुलीचा मुलगा सुफियान हा एक वर्षाचा असल्यापासून त्यांच्याजवळ राहतो. त्याचे आई-वडील नोकरीनिमित्त पुण्याला स्थायिक आहेत. पन्हाळ्यावर नातेवाइकांना भेटण्यासाठी मोपेडवरून तिघेजण दुपारी निघाले होते. रजपूतवाडी फाटा येथे पाठीमागून भरधाव आलेल्या एस.टी. बसने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये तिघेही मोपेडवरून रस्त्यावर पडले. सुफियानच्या डोक्याला मार लागून तो जाग्यावरच बेशुद्ध पडला होता, तर त्याचे आजी-आजोबा किरकोळ जखमी झाले. एस.टी.चालक अपघातस्थळी न थांबता एस.टी. बससह पसार झाला. रस्त्यावरील इतर नागरिकांनी तिघांना खासगी रुग्णवाहिकेतून सीपीआर रुग्णालयामध्ये आणले. याठिकाणी उपचारापूर्वीच सुफियानचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी समजताच आजी-आजोबांना मानसिक धक्का बसला. बालकाचा मृतदेह पाहून सीपीआरमधील डॉक्टरांसह पोलीस व नातेवाइकांना अश्रू अनावर झाले. यावेळी घटनास्थळी असलेल्या काही नागरिकांनी एस.टी. बसचा नंबर ६५०६ असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी एस.टी.च्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधून संबंधित नंबरच्या एस.टी. बसबाबत चौकशी केली असता ती कोल्हापूर-कोतोली मार्गावरील असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार त्या एस.टी. चालक व वाहकाचा मोबाईल नंबर पोलिसांनी मागवून घेतला.