नाराजी दूर करण्यासाठी कोल्हापुरात उद्धवसेनेचा पाचवा जिल्हाप्रमुख?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2025 17:07 IST2025-07-24T17:07:03+5:302025-07-24T17:07:22+5:30

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पवार यांच्यासह त्यांच्या समर्थकांना बोलावून समजूत काढण्याचा प्रयत्न केला, तरीही ते आपल्या भूमिकेवर ठाम

Uddhav Sena fifth district chief in Kolhapur to dispel resentment | नाराजी दूर करण्यासाठी कोल्हापुरात उद्धवसेनेचा पाचवा जिल्हाप्रमुख?

नाराजी दूर करण्यासाठी कोल्हापुरात उद्धवसेनेचा पाचवा जिल्हाप्रमुख?

कोल्हापूर : जिल्हाप्रमुख निवडीवरून उद्धवसेनेत उपनेते संजय पवार यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांच्या समर्थकांचे पुनर्वसन करण्याची तयारी सुरू केली आहे. यामध्ये ‘कोल्हापूर दक्षिण व करवीर’ विधानसभेचे दुसरे जिल्हाप्रमुख पद निर्माण करून या ठिकाणी विराज पाटील किंवा राजू यादव यांच्यापैकी एकाला संधी देत असताना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अवधूत साळाेखे यांच्यावर शहरप्रमुख पदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.

जिल्हाप्रमुख पदी रविकिरण इंगवले यांची नियुक्ती केल्यानंतर उपनेते संजय पवार यांनी त्यास विरोध करत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पवार यांच्यासह त्यांच्या समर्थकांना बोलावून समजूत काढण्याचा प्रयत्न केला, तरीही ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. अशा परिस्थितीत बंडाळी पक्षाला महागात पडू शकते. यासाठी पक्ष नेतृत्वाने यावर काय तोडगा काढता येईल, याची चाचपणी सुरू केली आहे.

उद्धवसेनेते सध्या रविकिरण इंगवले, सुनील शिंत्रे, संजय चौगले, वैभव उगले हे चार जिल्हाप्रमुख आहेत. यामध्ये आणखी एक जिल्हाप्रमुख पद निर्माण करून तिथे पवार समर्थकांची वर्णी लावण्याच्या हालचाली सुरू आहेत. कोल्हापूर दक्षिण शहरप्रमुख म्हणून अवधूत साळाेखे, तर राज्य संघटक म्हणून पद निर्माण करून त्याठिकाणी नावीज मुल्ला यांची नियुक्ती करण्याची खेळी पक्षाकडून खेळली जाऊ शकते.

पदांचा हा फार्म्युला कोणी दिला हे मला माहिती नाही, पण प्रस्ताव चांगला आहे. तसे केले तर वाद संपण्यास मदत होईल. - विराज पाटील

Web Title: Uddhav Sena fifth district chief in Kolhapur to dispel resentment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.