शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

Ichalkaranji Mayor: महापौरपदी उदय धातुंडे, उपमहापौरसाठी अनिल डाळ्या; आज अधिकृत घोषणा होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 11:51 IST

अंतिम घडामोडी निर्णायक

इचलकरंजी : येथील महानगरपालिकेचा पहिला महापौर व उपमहापौर निवडीसंदर्भात गुरूवारी दिवसभर प्रमुख नेतेमंडळींच्यात अनेक घडामोडी घडल्या. त्यातून महापौर पदासाठी उदय धातुंडे आणि उपमहापौर म्हणून अनिल डाळ्या यांची नावे आघाडीवर आली आहेत. आज, शुक्रवारी सकाळी अधिकृत घोषणा झाल्यानंतर अर्ज दाखल करून शनिवारी संध्याकाळी सर्व नगरसेवकांना एका थंड हवेच्या ठिकाणी हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.इचलकरंजीचा पहिला महापौर म्हणून आपलेच नाव इतिहासात नोंदवले जावे, यासाठी इच्छुकांकडून जोरदार फिल्डिंग लावली जात होती. त्यामध्ये आवाडे आणि हाळवणकर गटाकडून जोरदार रस्सीखेच सुरू होती. आपल्याला मानणारा नगरसेवकच महापौर असावा, असे दोन्ही गटाचे मत होते. त्यावर बैठक झाली. बैठकीमध्ये पहिल्या टप्प्यात सहा-सात जणांच्या नावांवर सुरू झालेली चर्चा अखेर दोन नावांवर पोहोचली. त्यामध्ये आवाडे गटाकडून धातुंडे, तर हाळवणकर गटाकडून प्रदीप धुत्रे या दोघांची नावे अंतिम चर्चेसाठी पुढे आली होती.गुरूवारी उपमहापौर आणि अन्य समित्यांच्या सभापतींबाबत चर्चा करून अखेरीस महापौर पदाचे नाव निश्चित करण्याचे बुधवारी (दि. ४) झालेल्या बैठकीत ठरवण्यात आले होते. त्यानुसार गुरूवारीही दिवसभर अनेक खलबते झाली. त्यामध्ये आवाडे गटाचे धातुंडे यांचे नाव महापौरसाठी पुढे आले, तर हाळवणकर गटाला उपमहापौरपद देण्याचे ठरवले. त्यानुसार धातुंडे आणि डाळ्या यांचे नाव आघाडीवर आले आहे. शुक्रवारी अधिकृत घोषणा झाल्यानंतर दोघांचेही अर्ज भरले जाणार आहेत.त्यानंतर शनिवारी किंवा रविवारी भाजप व महायुतीच्या नगरसेवकांना एका थंड हवेच्या ठिकाणी हलवले जाणार आहे. तेथून सोमवारी सर्वांना थेट सभागृहात आणून महापौर-उपमहापौर निवडीसाठीचे नियोजन लावले जाणार असल्याचेही समजते.

अंतिम घडामोडी निर्णायकगुरूवारी दिवसभर झालेल्या राजकीय घडामोडीनंतर सायंकाळपर्यंत धातुंडे आणि डाळ्या यांचे नाव महापौर-उपमहापौर पदासाठी पुढे आले आहे. त्यामध्ये रात्रीतून घडणाऱ्या अंतिम घडामोडी निर्णायक ठरणार आहेत. ऐनवेळी एखादे नाव बदलले जाण्याच्या चर्चेने रात्री उशिरापर्यंत जोर धरला होता. शुक्रवारी अधिकृत घोषणा झाल्यानंतरच सर्व चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Ichalkaranji gets new mayor: Uday Dhatunde, Anil Daly elected

Web Summary : Uday Dhatunde and Anil Daly are frontrunners for Ichalkaranji mayor and deputy mayor. Official announcement expected Friday, followed by strategic planning for Monday's election.
टॅग्स :Ichalkaranji Municipal Corporation Electionइचलकरंजी महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरMayorमहापौरBJPभाजपा