शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीच्या पहिल्या महापौरपदी उदय धातुंडे, उपमहापौरपदी अनिल डाळ्या यांची बिनविरोध निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 16:31 IST

ऐतिहासिक निवडीला बिनविरोधचे कोंदण

इचलकरंजी : येथील महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी भाजपचे उदय आनंदा धातुंडे यांची, तर उपमहापौरपदी भाजपचेच अनिल देवकरण डाळ्या यांची बिनविरोध निवड झाली. महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीमध्ये दोन्ही पदे बिनविरोध निवड करीत इतिहास नोंदविण्यात आला. निवड बिनविरोध करण्यासाठी शिव-शाहू विकास आघाडीने आपली उमेदवारी मागे घेत महत्त्वाची भूमिका बजावली.६५ नगरसेवकांच्या महानगरपालिका सभागृहामध्ये भाजप महायुतीकडे ४७ मतांचा आकडा होता, तर विरोधी शिव-शाहू विकास आघाडीकडे १७ व उद्धव सेनेचा १ नगरसेवक होता. त्यामुळे दोन्ही पदे भाजपला मिळणार, हे निर्विवाद सत्य असले तरीही निवड बिनविरोध करण्यासाठी भाजपच्या नेत्यांकडून शिव-शाहू विकास आघाडीच्या नेत्यांकडे विनंती केली होती. त्यामुळे या निवडीकडे लक्ष लागून राहिले होते. कोल्हापुरात वास्तव्यास असलेले महायुतीचे सर्व नगरसेवक-नगरसेविका सोमवारी सकाळी इचलकरंजीत आले. अटल बिहारी वाजपेयी चौकापासून थेट चालत त्यांनी सभागृहात प्रवेश केला. पिठासन अधिकारी संजय शिंदे यांनी सकाळी ११ वाजता सभेच्या कामकाजास सुरूवात केली. महापौरसाठी उमेदवारी अर्ज भरलेले शिव-शाहू विकास आघाडीचे नगरसेवक सयाजी चव्हाण यांनी महापौरच्या निवडीसाठी बोलविण्यात आलेल्या सभेला हरकत घेतली. ७ दिवसांची वेळ देण्याऐवजी २ दिवसांची वेळ देण्यात आली आहे. ही वेळ अपुरी आहे. त्यामुळे महापौर निवडीला स्थगिती द्यावी, अशी त्यांनी मागणी केली. मात्र, ही मागणी पिठासन अधिकाºयांनी फेटाळून लावली व सभेच्या कामकाजाला सुरूवात केली.उमेदवारी अर्जाच्या छाननीनंतर अर्ज मागे घेण्यासाठी १५ मिनिटांची मुदत देण्यात आली होती. निवडणुकीवर आक्षेप घेणारे चव्हाण यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. धातुंडे यांचा एकच अर्ज राहिल्याने पिठासन अधिकारी शिंदे यांनी धातुंडे यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर उपमहापौरपदाची निवडणूक पार पडली. उपमहापौरसाठी भाजपचे डाळ्या व शिव-शाहू विकास आघाडीच्या संगीता आलासे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आलासे यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतर डाळ्या यांचीही बिनविरोध निवड झाल्याचे शिंदे यांनी जाहीर केले.महानगरपालिकेच्या इतिहासात दोन्ही पदे बिनविरोध करण्यामध्ये सत्ताधाºयांनी यश मिळवले. निवडीनंतर आयुक्त पल्लवी पाटील व पिठासन अधिकाºयांच्या हस्ते नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांचा सत्कार करण्यात आला. निवडीनंतर बोलताना धातुंडे म्हणाले, मी माझ्या महायुतीचे ४७ नगरसेवक मानत नाही, तर सर्वच आपले ६५ नगरसेवक आहेत, असे मानतो. नशिबाने व आई-वडिलांच्या पुण्याईने मला हे पद मिळाले आहे. आपण हातात हात घालून काम करूया व शहरातील प्रश्न सोडवूया. पाण्यामध्ये राजकारण न करता कोणत्याही परिस्थितीत पाणी येईल, यासाठी प्रयत्न करूया.डाळ्या म्हणाले, पक्षाने मला संधी दिली आहे. आपण सर्वांनी एकदिलाने इचलकरंजी शहराच्या विकासासाठी काम करूया. रवींद्र माने, विठ्ठल चोपडे, उदयसिंह पाटील, मदन कारंडे, तानाजी पोवार अलका स्वामी, रणजित जाधव, ध्रुवती दळवाई, क्रांती आवळे, मनीषा नवनाळे, आदींनी मनोगत व्यक्त केले. महायुतीचे नगरसेवक भगवे फेटे बांधून, तर शिव-शाहू विकास आघाडीचे नगरसेवक भगव्या टोप्या घालून सभागृहात आले होते. निवडीनंतर त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण केली. तसेच शहरातून मिरवणूक काढली.नूतन सभागृहाचे उद्घाटनमहापौर निवडीच्या प्रारंभी मंत्री पाटील यांच्या हस्ते कोनशिला व फित कापून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, सुरेश हाळवणकर, आदींनी उपस्थिती लावली.

सत्ता कोणाची लवकर कळणार नाहीमहापौर निवडीनंतर शिव-शाहू विकास आघाडीचे गटनेते उदयसिंह पाटील हे मनोगत व्यक्त करताना सभागृहातील गटनेते विठ्ठल चोपडे, रवींद्र माने व मी माजी आमदार अशोकराव जांभळे व कारंडे यांच्या तालमीत तयार झालो आहे. त्यामुळे सत्ता कोणाची आहे, हे लगेच कळणार नाही, असे म्हणताच सभागृहात हशा पिकला.

सगळ्या मांडवाखालून जाऊ देमहापौरांनी एक मिनिटसुद्धा वेळ घालवू नये. वरिष्ठ नगरसेवकांचा मान-सन्मान ठेवावा. कामाची माणसे आम्हीच आहोत. वेळ न दवडता लवकर सभा बोलवावी व सगळ्यांना मांडवाखालून घालवावे, असे रवी रजपुते यांनी कोपरखळी मारल्यानंतर सभागृहात हशा पिकला.

English
हिंदी सारांश
Web Title : Ichalkaranji Gets First Mayor: Uday Dhatunde, Anil Daly নির্বাচিত Unopposed

Web Summary : Uday Dhatunde and Anil Daly were unanimously elected as Ichalkaranji's first mayor and deputy mayor, respectively. The Shiv-Shahu Vikas Aghadi withdrew its nomination, ensuring a smooth election for the BJP alliance in the newly formed municipal corporation.
टॅग्स :Ichalkaranji Municipal Corporation Electionइचलकरंजी महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरMayorमहापौरBJPभाजपा