एजीवडे, न्यू करंजे, दाऊतवाडी या खेड्यातील नागरिकांनी सात वर्षांपूर्वी वन विभागाची स्वेच्छा पुनर्वसन योजना स्वीकारली. याबद्दल प्रत्येक कुटुंबाला दहा लाख रुपयाचे अर्थसाहाय्य मिळाले. मात्र घर, शेतजमीन, झाडे याचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. येथील अनेक कुटुंबांनी स्थलांतर करून अन्यत्र घरे बांधली आहेत. मात्र, संपूर्ण मोबदला न मिळाल्याने ही कुटुंबे आर्थिक गर्तेत सापडली आहेत. याबाबत वारंवार भेटूनही प्रशासनाकडून पूर्तता होत नसल्याच्या निषेधार्थ आजचे उपोषण करण्यात आले. दरम्यान, तहसीलदार मीना निंबाळकर यांनी उपोषणकर्ते व वन्यजीव विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली. यावेळी विभागीय वनसंरक्षक अनिल जेरे यांनी यासाठी १८ कोटी ८८ लाखांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे निधी उपलब्ध झालेला नाही. येत्या ३१ मार्चपर्यंत निधी उपलब्ध होईल, त्यातून हा प्रश्न सोडवला जाईल, असे पत्र दिले. आंदोलकांचे नेतृत्व अनंत कसबले, दीपक शिरगावकर, चांद तांबोळी, संदीप कसबले यांनी केले.
अभयारण्यग्रस्तांचे राधानगरीत लाक्षणिक उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:53 IST
एजीवडे, न्यू करंजे, दाऊतवाडी या खेड्यातील नागरिकांनी सात वर्षांपूर्वी वन विभागाची स्वेच्छा पुनर्वसन योजना स्वीकारली. याबद्दल प्रत्येक कुटुंबाला दहा ...
अभयारण्यग्रस्तांचे राधानगरीत लाक्षणिक उपोषण
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}