पुईखडी टेकडीजवळ मोटारकार दरीत कोसळून कोल्हापूरचे दोघे तरुण ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2022 13:18 IST2022-06-05T12:23:04+5:302022-06-05T13:18:52+5:30
शुभम सोनार, शंतनु कुलकर्णी व संकेत कडणे व सौरभ कणसे हे चौघे आपल्या इनोव्हा मोटारीतून वाशी येथे गेले होते

पुईखडी टेकडीजवळ मोटारकार दरीत कोसळून कोल्हापूरचे दोघे तरुण ठार
कोल्हापूर : भरधाव मोटारकारवरील ताबा सुटल्याने ती सुमारे २५ फूट खोल दरीमध्ये कोसळून कोल्हापूरातील दोन तरुण जागीच ठार झाले. तर दोघे जखमी झाला. शुभम हेमंत सोनार (वय २४ रा. राजारामपूरी) व शंतनु शिरीष कुलकर्णी (वय २८ रा. मोरेवाडी, ता. करवीर) अशी ठार झालेल्या दोघांची नावे असून संकेत बाळकृष्ण कडणे (२१ रा. खाडीलकर गल्ली, गावभाव, सांगली), सौरभ रविंद्र कणसे (२६ रा. राजारामपूरी ६ वी गल्ली) असे जखमी तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.
घटनास्थळी मिळालेली माहिती अशी की, शुभम सोनार, शंतनु कुलकर्णी व संकेत कडणे व सौरभ कणसे हे चौघे आपल्या इनोव्हा मोटारीतून वाशी येथे गेले होते. तेथे फार्महाऊसवर जेवण करुन मध्यरात्री तिघेही घरी जात होते. त्यावेळी शुभम हा मोटारकार चालवत होता. भरधाव मोटारकार ही पुईखडी टेकडीवर आल्यानंतर त्यावरील ताबा सुटल्याने तीरस्त्याच्याकडेला जाऊन सुमारे २५ फूट खोल दरीत कोसळून उलटली. या दुर्घटनेत शुभम सुतार व शंतनु कुलकर्णी हे दोघे जागीच ठार झाले. तर संकेत कडणे व सौरभ कडणे हे दोघे किरकोळ जखमी झाले. जखमींना तातडीने सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.