शहरं
Join us  
Trending Stories
1
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
2
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
3
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
4
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
5
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
6
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
7
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
8
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
9
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
10
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
11
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
12
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
13
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
14
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
15
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
16
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
17
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
18
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
19
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
20
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोडोली येथे विहिरीत बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:22 IST

लोकमत न्युज नेटवर्क कोडोली : येथील वैभवनगर डवरी गल्लीतील शाळकरी मुले रंगपंचमी खेळून विहिरीत पोहण्यास गेली असताना ...

लोकमत न्युज नेटवर्क

कोडोली : येथील वैभवनगर डवरी गल्लीतील शाळकरी मुले रंगपंचमी खेळून विहिरीत पोहण्यास गेली असताना त्यातील दोघांचा बुडून मृत्यू झाला. शिवराज कृष्णात साळोखे (वय १४), शुभम लक्ष्मण पाथरवट (वय १५), अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. चार तासांच्या प्रयत्नांनंतर गळाच्या साहाय्याने दोघांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे कोडोली गावावर शोककळा पसरली आहे.

घटनास्थळाबरून मिळालेली माहिती अशी, वैभवनगर येथील पाच- सहा जण सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास रंगपंचमी खेळून झाल्यानंतर बामणाचा मळा नावाच्या परिसरातील कापरे यांच्या विहिरीत अंघोळीसाठी गेले होते. यावेळी शुभम व शिवराज हे कपडे काढून विहिरीच्या काठावर बसले होते. दरम्यान, त्यांचा तोल जाऊन ते विहिरीत कोसळले. दोघे पाण्यात बुडाल्याने व बाहेर न आल्याचे पाहून शुभमचा भाऊ भीतीने ओरडत गावात पळत आला. त्यानंतर घरातील लोक व ग्रामस्थांनी शोधमोहीम राबवली. चाळीस फुटांपर्यंत पाण्याची खोली असल्याने दुपारपर्यंत ते मिळून आले नव्हते. अखेर कोल्हापूर व्हाइट आर्मी व कोडोली येथील गनिमा कावा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गळ टाकून शोधमोहीम सुरू केली. शुभम याचा २.४५ वाजेच्या सुमारास, तर शिवराज याचा ३.०० वाजेच्या सुमारास मृतदेह सापडला.

शिवराज साळोखे नववीत शिकत होता. त्याचे वडील शेतकरी आहेत. शुभम हा आठवीमध्ये शिकत होता, त्याची आई शिलाईची कामे करून उदर्निवाह करते. घटनास्थळी कोडोलीचे मंडळ अधिकारी अभिजित पवार, तलाठी अनिल पोवार, कोतवाल सिराज आंबी, उपसरपंच निखिल पाटील, ग्रामपंचायत सदस्य माणिक मोरे, बाजीराव केकरे, कोडोली पोलीस ठाण्याचे सपोनि. दिनेश काशीद यांच्यासह पोलीस यंत्रणा उपस्थित होती. यावेळी कोल्हापूर व्हाइट आर्मीचे निखिल लंबू व अजिंक्य सातपुते, तसेच कोडोली गनिमी कावाचे प्रदीप पाटील, प्रवीण पाटील, शरद भोसले, सागर मोरे यांनी गळ टाकून मृतदेह बाहेर काढला. यावेळी शशिकांत नलवडे, नथुराम तेली, संतोष निपाणीकर, युवराज मांगलेकर संदीप सांगलेकर, शैलेंद्र सांगलेकर, सुहास जगताप, बाळू जंटली यांनी विशेष प्रयत्न केले.

शुभम पाथरवट याच्या पश्चात आई, एक भाऊ, तर शिवराज साळुंखे याच्या पश्चात आई, वडील, भाऊ व तीन बहिणी, असा परिवार आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले.

०२ शुभम पाथरवट ०२शिवराज साळोखे फोटो आहे.