उत्तरेश्वर पेठेत घरातून दोन मोबाईल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:30 IST2021-09-04T04:30:20+5:302021-09-04T04:30:20+5:30

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी सुतार हे उत्तरेश्वर पेठेत राहतात. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराचे उघड्या दरवाजातून ...

Two mobile lamps from a house in Uttareshwar Peth | उत्तरेश्वर पेठेत घरातून दोन मोबाईल लंपास

उत्तरेश्वर पेठेत घरातून दोन मोबाईल लंपास

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी सुतार हे उत्तरेश्वर पेठेत राहतात. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराचे उघड्या दरवाजातून प्रवेश करून दोन किमती मोबाईल संच लंपास केले. हा चोरीचा प्रकार लक्षात येताच सुतार यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात तत्काळ फिर्याद नोंद केल्यामुळे पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदविला.

सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

एका छोट्या गल्लीत दोन महिला एका लहान मुलासह जातात. त्यांचा वावर हा संशयस्पद आहे. त्यांच्यासोबतचा लहान मुलगा एका घरात प्रवेश करतो. त्यानंतर तो बाहेर येतो. आल्यापावली ते तेथून निघून जातात. अशाप्रकारचे सीसीटीव्ही फुटेज सर्वत्र व्हायरल झाले आहे. या सीसीटीव्ही फुटेजचे आणि घडलेल्या चोरीचे काही कनेक्शन आहे का याबाबतची तपासणी पोलीस करीत आहेत.

Web Title: Two mobile lamps from a house in Uttareshwar Peth