शहरं
Join us  
Trending Stories
1
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
2
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
3
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
4
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
5
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
6
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
7
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
8
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
9
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
10
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
11
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
12
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
13
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
14
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
15
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
16
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
17
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
18
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
19
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
20
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
Daily Top 2Weekly Top 5

दोघा इराणी चेन स्नॅचरना दोन दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 18:47 IST

चेन स्नॅचिंग आणि पोलीस असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या इराणी टोळीतील अटक केलेल्या नागपूरच्या दोघांना बुधवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. शब्बीर सलीम अली (वय ३४), नादिर तालीब जैदी (४८, दोघेही रा. न्यू येरखेडा, कामठी, जि. नागपूर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या चार साथीदारांच्या शोधासाठी पोलिसांची पथके वेगवेगळ्या ठिकाणी पाठविली आहेत.

ठळक मुद्देटोळीतील चौघा सहकाऱ्यांचा शोध सुरू स्थानिक गुन्हे अन्वेषणची पथके रवाना

कोल्हापूर : चेन स्नॅचिंग आणि पोलीस असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या इराणी टोळीतील अटक केलेल्या नागपूरच्या दोघांना बुधवारी न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. शब्बीर सलीम अली (वय ३४), नादिर तालीब जैदी (४८, दोघेही रा. न्यू येरखेडा, कामठी, जि. नागपूर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या चार साथीदारांच्या शोधासाठी पोलिसांची पथके वेगवेगळ्या ठिकाणी पाठविली आहेत.शहर व परिसरात महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून चोरण्याच्या घटना वाढल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने तपासणी करताना मंगळवारी मार्केट यार्डजवळ दोघा संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांची चेन स्नॅचिंग करणारी इराणी टोळी कोल्हापुरात येऊन सक्रिय झाल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी कामठी (जि. नागपूर) येथील शब्बीर अली, नादिर जैदी या दोघांना अटक केली.

त्यांच्याकडून रंकाळा स्टॅण्ड परिसरातील पोलीस असल्याचा बहाणा करून वृद्धेचे दागिने लुबाडल्याचा तसेच शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चेन स्नॅचिंग असे दोन गुन्हे उघडकीस येऊन त्यातील सुमारे एक लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. त्याचे नसीम मेहंदी अली, युसूफ अमीर अली, मोहसीन गुलामराजा (गोलू) व हैदर युसूफ अली (सर्व रा. कामठी, नागपूर) हे अन्य साथीदारही पसार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, अटक केलेल्या दोघांना बुधवारी दुपारी न्यायालयात उभे केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर