मार्केट यार्ड परिसरात चाकू हल्ल्यात दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:55 IST2021-02-05T06:55:53+5:302021-02-05T06:55:53+5:30

कोल्हापूर : मार्केट यार्ड परिसरात पूर्ववैमनस्यातून झालेल्या चाकू हल्ल्यात जमीर महंमदअली बेपारी (वय ३४, रा. मस्जिद मोहल्ला) व एक ...

Two injured in knife attack in Market Yard area | मार्केट यार्ड परिसरात चाकू हल्ल्यात दोघे जखमी

मार्केट यार्ड परिसरात चाकू हल्ल्यात दोघे जखमी

कोल्हापूर : मार्केट यार्ड परिसरात पूर्ववैमनस्यातून झालेल्या चाकू हल्ल्यात जमीर महंमदअली बेपारी (वय ३४, रा. मस्जिद मोहल्ला) व एक अनोळखी असे दोघे जखमी झाले. या प्रकरणी नीलेश बाबूराव बुटे, अक्षय बाबूराव बुटे, वैभव दीपक कांबळे, स्वप्निल मधुकर कदम (सर्व रा. विक्रमनगर) या संशयितांवर शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जखमी जमीर बेपारी व संशयित नीलेश, अक्षय बुटे, वैभव कांबळे, स्वप्निल कदम हे सर्व जण एकमेकांच्या ओळखीचे आहेत. पैशाच्या देवाण-घेवाणीवरून गेले काही दिवस त्यांच्यात वाद सुरू आहे. त्यातून मार्केट यार्ड येथे रविवारी (दि. २४) रात्री चार संशयितांनी बेपारी यांना लाथाबुक्क्‍यांनी व चाकूने मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी एका अनोळखी व्यक्तीने प्रयत्न केला. त्यालाही या चौघांनी मारहाण केली, त्यामध्ये तोही जखमी झाला, अशी फिर्याद बेपारी यांनी शाहुपुरी पोलीस ठाण्यात दिली.

Web Title: Two injured in knife attack in Market Yard area