डिजिटल फलक फाडल्याच्या रागातून लक्षतीर्थ येथे तलवार हल्ला, दोघे जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 11:49 IST2022-05-17T11:49:28+5:302022-05-17T11:49:51+5:30

परिसरातील नागरिक गोळा झाल्याने हल्लेखोर पसार झाले. रात्री उशिरा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला.

Two injured in sword attack at Lakshatirtha kolhapur city | डिजिटल फलक फाडल्याच्या रागातून लक्षतीर्थ येथे तलवार हल्ला, दोघे जखमी

डिजिटल फलक फाडल्याच्या रागातून लक्षतीर्थ येथे तलवार हल्ला, दोघे जखमी

कोल्हापूर : डिजिटल फलक फाडल्याच्या रागातून केलेल्या तलवार हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना लक्षतीर्थ वसाहतीत सोमवार रात्री उशिरा घडली. संतोष सोनाबा बोडके (वय ४०) व कृष्णात कोंडीबा बोडेकर (वय ३५, रा. सासने कॉलनी) अशी जखमींची नावे आहेत.

विजय उर्फ रिंकू देसाई याचा सोमवारी वाढदिवस होता. त्यानिमित्ताने रिंगरोड परिसरात डिजिटल फलक लावले होते. त्यातील एक फलक कोणीतरी फाडला. तो बोडके व बोडेकर यांनी फाडला, असे समजून देसाई गटाच्या दहा जणांनी बोडके याच्या घरात हल्ला केला. यावेळी हल्लेखोर हातात तलवार, कोयते, गज घेऊन आले होते.

संतोष बोडके याच्या हातावर तर कृष्णात बोडेकर याच्या डोक्यावर वार झाले आहेत. परिसरातील नागरिक गोळा झाल्याने हल्लेखोर पसार झाले. रात्री उशिरा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. सी. पी. आर. परिसरात बोडके याच्या समर्थकांनी गर्दी केली होती. त्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला.

Web Title: Two injured in sword attack at Lakshatirtha kolhapur city