धरण क्षेत्रात पाऊस वाढल्याने राधानगरीचे दोन दरवाजे खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 17:55 IST2020-08-10T17:51:22+5:302020-08-10T17:55:05+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी पुन्हा सुरुवात केली. दिवसभर एकसारखी रिपरिप राहिली असून धरण क्षेत्रातही पाऊस वाढल्याने राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. त्यामुळे अगोदरच संथगतीने उतरणारे पुराचे पाणी पुन्हा स्थिर होऊ लागले आहे.

धरण क्षेत्रात पाऊस वाढल्याने राधानगरीचे दोन दरवाजे खुले
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारी पुन्हा सुरुवात केली. दिवसभर एकसारखी रिपरिप राहिली असून धरण क्षेत्रातही पाऊस वाढल्याने राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. त्यामुळे अगोदरच संथगतीने उतरणारे पुराचे पाणी पुन्हा स्थिर होऊ लागले आहे.
जिल्ह्यात गेल्या आठवड्यात धुवाधार पावसाने महापूर आणला होता. मात्र, शुक्रवार(दि. ७)पासून पावसाने काहीशी उसंत घेतल्याने पुराचे पाणी ओसरू लागले. तीन-चार दिवस खडखडीत उघडीप दिल्याने नद्यांची पाणी पातळी हळू-हळू कमी होत गेली. मात्र, सोमवारी सकाळपासून पावसाने पुन्हा सुरुवात केली आहे.
दिवसभर एकसारखी रिपरिप सुरू आहे. धरणक्षेत्रातही पाऊस वाढल्याने राधानगरी धरणाचे क्रमांक ३ व ६ हे स्वयंचलित दरवाजे खुले होऊन त्यातून प्रतिसेकंद ४२५६ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
दूधगंगा धरण ८६.६५ टक्के भरले असून त्यातून १८०० तर वारणा धरण ८५.९१ टक्के भरल्याने २५१७ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अद्याप ४७ बंधारे व ५८ मार्ग बंद असल्याने वाहतूक विस्कळीत आहे.