बेकायदेशीर गुटखा वाहतूक दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:22 IST2021-03-21T04:22:52+5:302021-03-21T04:22:52+5:30

इचलकरंजी : येथील नदीवेस नाका परिसरात मोटारसायकलवरून गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्या दोघांना गावभाग पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ...

Two arrested for smuggling gutka | बेकायदेशीर गुटखा वाहतूक दोघांना अटक

बेकायदेशीर गुटखा वाहतूक दोघांना अटक

इचलकरंजी : येथील नदीवेस नाका परिसरात मोटारसायकलवरून गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्या दोघांना गावभाग पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून विविध कंपन्यांचा गुटखा व दुचाकी मिळून 1 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरिफ मुबारक मुजावर (वय 19) आणि वैभव आदिनाथ चौगुले (वय 24 दोघे, रा. हातकणंगले), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, येथील नदीवेस नाका परिसरात पोलिसांकडून वाहन तपासणीचे काम सुरू होते. त्यावेळी शिरदवाडकडून मोटारसायकल (एमएच 09 एफएफ 8352)वरून आलेल्या दोघांना संशयावरून ताब्यात घेण्यात आले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडील पिशव्यांमध्ये विमल, मुसाफीर यासह विविध कंपन्यांचा गुटखा, सुगंधी तंबाखू, असा 30 हजार रुपयांचा मुद्देमाल, 900 रुपयांची रोकड आणि 75 हजार रुपयांची दुचाकी, असा 1 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

२० आयसीएच गुटखा

(फोटो ओळी)

इचलकरंजीत बेकायदेशीर गुटखा वाहतूक करणाऱ्या दोघांना गावभाग पोलिसांनी अटक केली.

Web Title: Two arrested for smuggling gutka