डिजिटल अरेस्टप्रकरणी पुण्यातून दोघे ताब्यात, कोल्हापुरातील सेवानिवृत्त प्राध्यापिकेला घातला होता ३ कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 15:59 IST2025-06-05T15:58:30+5:302025-06-05T15:59:17+5:30

सायबर सेलच्या माध्यमातून तपास गतिमान केला

Two arrested from Pune for cheating a retired professor from Kolhapur of Rs 3 crore by threatening her with digital arrest | डिजिटल अरेस्टप्रकरणी पुण्यातून दोघे ताब्यात, कोल्हापुरातील सेवानिवृत्त प्राध्यापिकेला घातला होता ३ कोटींचा गंडा

डिजिटल अरेस्टप्रकरणी पुण्यातून दोघे ताब्यात, कोल्हापुरातील सेवानिवृत्त प्राध्यापिकेला घातला होता ३ कोटींचा गंडा

कोल्हापूर : येथील सेवानिवृत्त प्रा. मीना डोंगरे यांना डिजिटल अरेस्टची भीती दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी बुधवारी पोलिसांनी पुण्यात दोघा संशयितांना ताब्यात घेतले. तपासात अडथळा येऊ नये म्हणून त्यांनी नावे गाेपनीय ठेवली आहेत.

सायबर भामट्यांनी डिजिटल अरेस्टची भीती दाखवत डोंगरे यांची ३ कोटी ५७ लाखांची फसवणूक केली. यापूर्वी पुण्यातील एका ज्येष्ठाची अशाच पद्धतीने ६ कोटी २९ लाख रुपयांची फसवणूक झाली होती. शिवाजीनगर पोलिसांनी संबंधित भामट्याला अटक केली होती. त्यानंतर येथे मोठी फसवणुकीची घटना घडली. यामुळे पोलिस दल सतर्क झाले आहे. सायबर सेलच्या माध्यमातून तपास गतिमान केला आहे. 

पुण्यातून एका संशयिताला ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडील चौकशीनंतर अशा पद्धतीने फसवणुकीत सहभागी असलेल्या आणखी दोघांची नावे समोर आली आहेत. येथील फसवणुकीचा तपास करण्यासाठी मंगळवारी सायबर सेल आणि राजारामपुरी पोलिसांचे पथक पुणे येथे गेले होते. या पथकाने आणखी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांना कोल्हापुरात आणून त्यांची सविस्तर चौकशी होणार आहे.

Web Title: Two arrested from Pune for cheating a retired professor from Kolhapur of Rs 3 crore by threatening her with digital arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.