Kolhapur Crime News: नोकरीचे आमिष दाखवून ४२ लाखांची फसवणूक, दोघे अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 13:00 IST2026-03-17T12:59:13+5:302026-03-17T13:00:07+5:30

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात शिपाई पदावर नोकरी लावण्याचे आमिष

Two arrested for cheating Rs 42 lakhs on the pretext of job in kolhapur | Kolhapur Crime News: नोकरीचे आमिष दाखवून ४२ लाखांची फसवणूक, दोघे अटकेत

Kolhapur Crime News: नोकरीचे आमिष दाखवून ४२ लाखांची फसवणूक, दोघे अटकेत

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात शिपाई पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून चौघांची ४२ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जुना राजवाडा पोलिसांनी दोघांना सोमवारी (दि. १६) अटक केली. राजेंद्र मनोहर पाटील (वय ७०, रा. फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर) आणि राजू दत्तात्रय सरनाईक (५४, रा. फुलेवाडी पाचवा बस स्टॉप), अशी अटकेतील दोघांची नावे आहेत.

याबाबत संजय वसंत सनगर (५६, रा. फुलेवाडी) यांनी शनिवारी (दि. १४) फिर्याद दिली होती. अटकेतील राजेंद्र पाटील आणि राजू सरनाईक यांनी ११ लाख रुपये घेऊन फिर्यादी सनगर यांच्या मुलाला नोकरी लावण्याचे आमिष दाखवले होते. तसेच श्रीकांत सनगर यांच्याकडून १० लाख ६० हजार, एकनाथ गडकर यांच्याकडून १३ लाख ५४ हजार आणि प्रकाश भरणकर यांच्याकडून आठ लाख सात हजार रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली आहे.

या दोघांनाही पोलिसांनी सोमवारी चौकशीसाठी बोलवले होते. चौकशीत त्यांनी समाधानकारक माहिती न दिल्याने त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.

मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाईल. नोकरीचे आमिष दाखवून त्यांनी आणखी कोणाकडून पैसे घेतले असल्यास संबंधितांनी तक्रारी द्याव्यात, असे आवाहन पोलिस निरीक्षक किरण लोंढे यांनी केले आहे.

Web Title : कोल्हापुर: नौकरी के नाम पर 42 लाख की धोखाधड़ी, दो गिरफ्तार

Web Summary : कोल्हापुर में सरकारी नौकरी दिलाने का वादा करके दो लोगों ने चार लोगों से 42 लाख रुपये की धोखाधड़ी की। आरोपी राजेंद्र पाटिल और राजू सरनाईक ने झूठे वादे करके पीड़ितों को फंसाया और उनसे पैसे लिए। पुलिस ने अन्य पीड़ितों से आगे आकर शिकायत दर्ज कराने का आग्रह किया है।

Web Title : Kolhapur: Job Racket Busted, Two Arrested for ₹4.2 Million Fraud

Web Summary : Two individuals were arrested in Kolhapur for defrauding four people of ₹4.2 million by promising government jobs. The accused, Rajendra Patil and Raju Sarnaik, lured victims with false promises, taking money from each. Police urge others who may have been victimized to come forward and file complaints.