शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
5
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
6
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
7
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
8
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
9
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
10
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
11
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
12
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
13
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
14
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
15
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
16
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
17
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
18
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
19
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
20
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
Daily Top 2Weekly Top 5

वंचितांची बाजू मांडणाराच सच्चा लेखक : इंगळे

By admin | Updated: June 22, 2015 00:22 IST

राजर्षी शाहू व्याख्यानमाला

कोल्हापूर : प्रत्येक सच्चा लेखक हा व्यवस्थेच्या बाजूने कधीच नसतो. तो नेहमी व्यवस्थेच्या विरोधात जाऊन वंचिताची बाजू मांडतो. त्याच्या लेखनाचा आत्मा वंचितांसाठीच असतो. ‘निशाणी डावा अंगठा’मध्ये हाच प्रयत्न केला आहे, असे मत प्रसिद्ध कादंबरीकार डॉ. रमेश इंगळे यांनी व्यक्त केले. ते राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टतर्फे शाहू स्मारक भवनात आयोजित करण्यात आलेल्या राजर्षी शाहू व्याख्यानमालेतील पहिले पुष्प गुंफताना रविवारी बोलत होते. ‘निशाणी डावा अंगठा’ हा व्याख्यानाचा विषय होता. अध्यक्षस्थानी डॉ. अशोक चौसाळकर होते.डॉ. इंगळे म्हणाले, शिक्षण व्यवस्थेमध्ये आलेले त्रासदायक भ्रष्ट अनुभव, व्यक्तीच्या कलावंत म्हणून जगण्याला हादरे देणारी वृत्ती मांडण्याचा प्रयत्न मी केला आहे. बुलढाणा जिल्ह्यात राबवण्यात आलेल्या प्रौढ साक्षरता अभियानादरम्यान प्रत्यक्ष घडलेल्या घटनेवर ‘निशाणी डावा अंगठा’ आधारित आहे. रस्त्यावर न उतरता लेखणीच्या माध्यमातून शिक्षण व्यवस्थेतील वाईट प्रवृत्तींवर आसूड ओढण्याचा प्रयत्न यात केलेला आहे. ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्थेवर लिहिणारा लेखक हा आपला माणूस नाही, ही धारणा आजही आहे. शेती हाच ग्रामीण साहित्याचा पैलू म्हणून ओळखला जातो; पण ग्रामीण भागातील शाळा, या शाळांशी संबंधित विविध घटक हा ग्रामीण साहित्याचा भाग असायला हवा, अशी अपेक्षाही डॉ. इंगळे यांनी व्यक्त केली. डॉ. इंगळे म्हणाले, व्यवस्था परिवर्तनासाठी लेखकाची लढाई ही कागदावर उतरते. गेंड्याची कातडी असलेल्या भ्रष्ट शिक्षण व्यवस्थेवर ‘निशाणी डावा अंगठा’मधून आसूड ओढण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा प्रयत्न शिक्षण व्यवस्थेतील कारभारावर प्रकाश टाकणारा असला तरी अन्य खात्यातील कारभार असाच असल्याचे दस्तुरखुद्द त्या-त्या विभागांतूनच ऐकायला मिळतो, हे या कादंबरीचे यश आहे. अध्यक्षीय भाषणात डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले, शिक्षण व्यवस्थेच्या व्यथा डॉ. इंगळे यांनी मांडल्या आहेत. या व्यवस्थेमध्ये काम करतानाही त्यांनी आपले स्वत्व जपत ते लेखनामध्ये उतरवले आहे. व्यवस्था सुधारण्यासाठी अशा कादंबरीकारांची आज गरज आहे. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, जिल्हा पुरवठा अधिकारी विवेक आगवणे, राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे प्रशासन अधिकारी राजदीप सुर्वे, आदी उपस्थित होते. डॉ. रणधीर शिंदे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)