शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवरायांचा त्रिवार जयजयकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:10 IST

कोल्हापूर : चौकाचौकांत लावलेले भगवे ध्वज, शाहिराच्या डफाचा घुमणारा आवाज, शिवरायांचा जयघोष अशा प्रेरणादायी वातावरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त ...

कोल्हापूर : चौकाचौकांत लावलेले भगवे ध्वज, शाहिराच्या डफाचा घुमणारा आवाज, शिवरायांचा जयघोष अशा प्रेरणादायी वातावरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त शुक्रवारी करवीरवासीयांनी मानाचा मुजरा केला. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत मिरवणुका टाळून चौकाचौकांतील जयघोषामध्ये आबालवृद्ध सहभागी झाले.

गेले दोन दिवस शहरामध्ये शिवजयंतीची जय्यत तयारी सुरू होती. मात्र, या चार-पाच दिवसांतच राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने साहजिकच प्रशासनाने दक्षतेची भूमिका जाहीर केली. त्यामुळे शिवभक्तांचा थोडा हिरमोड झाला. ठिकठिकाणी पोवाडे, मर्दानी खेळांचे आयोजन करण्यात आले होते. चौकाचौकांत शिवपुतळ्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. भगव्या पताका वाऱ्याबरोबर लहरत होत्या. शिवाजी पेठ, बुधवार पेठ, कसबा बावडा परिसरातील शिवपुतळ्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

येथील नर्सरी बागेमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेल्या पहिल्या ऐतिहासिक शिवाजी मंदिरात सकाळी १० वाजता शिवजन्म सोहळा संपन्न झाला. यावेळी चांदीच्या पाळण्याची यशस्विनीराजे आणि यशराजराजे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. शाहू छत्रपती, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यावेळी उपस्थित होते.

शिवाजी चौकातील पुतळ्यासमोरही शिवजन्मसोहळा संपन्न झाला. यावेळी शाहू छत्रपती, खासदार संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, डॉ. योेगेश जाधव, विजय देवणे, माजी महापौर निलोफर आजरेकर, आदिल फरास, आर. के. पोवार, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मिरजकर तिकटी येथे मावळा ग्रुपतर्फे भव्य शिवपुतळा उभारण्यात आला आहे. दुपारी मधुरिमाराजे आणि जयश्री जाधव यांच्या उपस्थितीमध्ये शिवजन्म सोहळा संपन्न झाला. त्यांच्यासोबत कोरोनाकाळात काम करणाऱ्या डॉक्टर्स आणि नर्सेस यांनाही पाचारण करण्यात आले होते. संध्याकाळी मल्लखांबाची प्रात्यक्षिके घेण्यात आली. आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी उपस्थिती दर्शविली. अध्यक्ष उमेश पवार, संदीप बोरगावकर, युवराज पाटील, अमोल गायकवाड, अभिजित भोसले, संतोष हेब्बाळे, रमाकांत बिल्ले यांनी सहकाऱ्यांसह कार्यक्रमांचे नियोजन केले.

चौकट

चिमुकल्यांचा अपार उत्साह

सायकलीला फडफडणारा भगवा ध्वज.. त्यावर शिवछत्रपतींची प्रतिमा आणि मुखात राजेंचा जयजयकार करत फिरणारी मुले साऱ्या शहरभर दिसत होती. शहर असो की गाव तिथे शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन झाले. भल्या पहाटेपासून तरुण शिवज्योत घेऊन धावत गावी जाताना सर्वत्र दिसत होते.

‘करवीर नाद’चा ताल

‘करवीर नाद’ या ढोलपथकाने शुक्रवारी दुपारी मिरजकर तिकटीवर आपल्या वादन कौशल्याचे शानदार प्रदर्शन केले. या पथकाच्या युवा सदस्यांनी ढोल-ताशांच्या तालावर उपस्थितांना डोलायला लावले. अनेकांनी यावेळी या वादनाचे मोबाईलवर चित्रीकरण करून घेतले.

चौकट

फोटोसाठी गर्दी

लहान मुलांपासून ते युवक-युवतीपर्यंत आणि मोठ्या व्यक्तींपासून महिलांपर्यंत अनेकांनी भव्य शिवपुतळ्याजवळ फोटो काढण्यासाठी गर्दी केली होती. ठिकठिकाणी सेल्फीपासून ते व्यासपीठावरील पुतळ्याजवळ उभारून फोटो काढले जात असल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळाले. अश्वारूढ भव्य शिवपुतळ्यांमुळे एक वेगळेच वातावरण अनुभवण्यास मिळाले.

चौकट

मातोश्री वृद्धाश्रमात शिवजयंती

येथील शुक्रवार पेठेतील शिवशक्ती प्रतिष्ठानने आपला नववा वर्धापनदिन प्रथेप्रमाणे चंबुखडी येथील वृद्धाश्रमात साजरा केला. वृद्धाश्रमास आवश्यक साहित्याचे वितरण करण्यात आले. मर्दानी खेळ सादर करण्यात आले. यावेळी वैशाली राजशेखर, सुर्यप्रभा चिटणीस, प्रतिष्ठानचे अध्यक्ष साताप्पा कडव, उपाध्यक्ष अशाेक रोकडे, सचिव अमोल पोवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

चौकट

शिवाजी स्टेडियमची स्वच्छता

शिवजयंतीचे औचित्य साधून शिवाजी स्टेडियम परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्टेडियमची शुक्रवारी स्वच्छता केली. विशाल शिराळकर यांनी यासाठी पुढाकार घेतला. यावेळी ४० पोती बाटल्यांचा व इतर कचरा गोळा करण्यात आला. स्टेडियमवर फिरायला येणारे नागरिकांसह पूजा शिराळकर, जयंत भुर्के, अमित अतिग्रे, बंडोपंत कदम, बंडोपंत वाकरे, अविनाश जुगदार, हसमुख पटेल, अरुण पाटील यांच्यासह विद्यार्थी सहभागी झाले.