परिवहन कर्मचारी सहाव्या दिवशीही संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:22 IST2021-04-13T04:22:43+5:302021-04-13T04:22:43+5:30

कर्नाटक परिवहन कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनाच्या सहाव्या दिवशीही बस बंद राहिल्याने सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. निपाणी आगारातून ...

Transport workers on strike for sixth day | परिवहन कर्मचारी सहाव्या दिवशीही संपावर

परिवहन कर्मचारी सहाव्या दिवशीही संपावर

कर्नाटक परिवहन कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या कामबंद आंदोलनाच्या सहाव्या दिवशीही बस बंद राहिल्याने सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. निपाणी आगारातून रोज ९० बस धावत असतात; पण कर्मचारी संपावर गेल्याने बस सेवा ठप्प झाली आहे. सध्या इतर कर्मचाऱ्यांचा उपयोग करून निपाणी आगाराने १२ बस सुरू केल्या आहेत. यामुळे आगाराचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.

निपाणी हा सीमा भागाचा केंद्रबिंदू व मोठी बाजारपेठ असल्याने येथे हजारो प्रवासी येत असतात; पण कर्नाटकातील परिवहन कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने सर्वत्र बससेवा बंद आहे. निपाणी आगारातील ३५० चालक, वाहक व इतर कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. यामुळे आगाराने पर्यायी व्यवस्था उभी करत १२ बस सुरू केल्या आहेत. या बस चिकोडी, बेळगाव, बोरगाव आदी मार्गांवर धावत आहेत. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने प्रवासी निपाणीकडे येण्यास इच्छुक आहेत; पण बससेवा बंद असल्याने प्रवाशांची कुचंबणा झाली आहे.

कर्मचारी वर्गाच्या मागण्या

परिवहन कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचारी पदाचा दर्जा मिळावा. आरोग्य संजीवनी योजना मिळावी. सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला ३० लाखांची भरपाई, प्रशिक्षण कालावधी २ वर्षांवरून १ वर्ष करावा, परिवहन मंडळात मनुष्यबळ विभाग असावा. कर्मचारी भत्ता मिळावा, आंतरनिगम बदलीची संधी मिळावी, वैद्यकीय शुल्क परतावा मिळावा, त्रास देणाऱ्यांवर कारवाई व्हावी, अशा मागण्यांचा समावेश आहे.

Web Title: Transport workers on strike for sixth day