शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

व्यापार आजपासून सुरू, पण वेळ मर्यादेची धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:22 IST

कोल्हापूर : कडक लॉकडाऊन शिथिल झाल्याने आज, सोमवारपासून व्यापार पूर्ववत होणार आहे; पण सकाळी ७ ते ११ या वेळेतच ...

कोल्हापूर : कडक लॉकडाऊन शिथिल झाल्याने आज, सोमवारपासून व्यापार पूर्ववत होणार आहे; पण सकाळी ७ ते ११ या वेळेतच दुकाने सुरू ठेवण्याचे बंधन कायम राहणार असल्याने व्यापाऱ्यांमध्ये धास्ती कायम आहे. केवळ चार तासांतच व्यापार करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. यामुळे सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाने १६ मेपासून आठ दिवस कडक लॉकडाऊन लागू केले. आज, सोमवारपासून त्यामध्ये शिथिलता आणली आहे. मात्र, राज्य सरकारचा लॉकडाऊन १ जूनपर्यंत कायम राहणार आहे. या कालावधीत फक्त सकाळी ७ ते ११ या वेळेतच दुकाने सुरू करण्याची परवानगी आहे. व्यापार करण्यासाठी सकाळी ७ ही वेळे गैरसोयीची आहे. चार तासच दिल्याने सकाळी १० ते ११ या वेळेतच ग्राहकांची गर्दी होते. परिणामी गर्दीवर नियंत्रण ठेवणे संबंधित दुकानदाराला शक्य होत नाही.

कमी वेळेमुळे ग्राहकांनाही दुकानदार देईल तशी वस्तू घेऊन जावे लागते. ग्राहक आणि व्यापाऱ्यांच्या दृष्टीनेही सकाळच्या टप्प्यातील वेळ गैरसोयीची आहे. वेळ वाढवून मिळण्यासाठी चेंबर कॉमर्सतर्फे प्रयत्न करीत आहे; पण जिल्हा प्रशासन सरकारकडे बोट दाखवत चेंबरच्या मागणी बेदखल करीत आहे. यामुळे चेंबर ऑफ कॉमर्सचे प्रमुख पदाधिकारी आमदार चंद्रकांत जाधव यांची भेट घेणार आहेत.

चौकट

सराफ व्यावसायिकांत चिंता

सराफ दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी नसल्याने त्यांच्यातही नाराजी निर्माण झाली आहे. ऐन लग्नाच्या हंगामातच लॉकडाऊन झाल्याने सराफ व्यावसायिकांत चिंतेचे वातावरण आहे. सलून, स्पा, ब्यूटी पार्लर १ जूनपर्यंत बंद राहणार असल्याने त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

चौकट

रोज ६० कोटींपर्यंत नुकसान

लग्न सराई, विविध कार्यक्रमांच्या हंगामातच कडक लॉकडाऊन लागू केल्याने शहर आणि जिल्ह्यात रोज ६० कोटींचा फटका बसला आहे. विविध प्रकारच्या दुकानांत काम करणाऱ्या कामगारांवरही बेरोजगार होण्याची वेळ आली आहे. म्हणूनच कोरोना प्रतिबंधासाठी सर्व प्रकारची काळजी, आरोग्य प्रशासनाचे नियम पाळतो, पण दुकाने पूर्ण वेळ सुरू करण्याची मुभा मिळावी, अशी मागणी सर्वच व्यापाऱ्यांची आहे.

कोट

कडक लॉकडाऊन उठला तरी वेळेचे बंधन कायम असणार आहे. सकाळी ७ ते ११ या वेळेतच व्यापार करताना अडचणी येतात. वेळ संपण्याच्या शेवटच्या टप्प्यात गर्दी होण्याचा धोका असतो. म्हणून सकाळी ९ ते ५ यावेळेत सर्वच दुकाने सुरू करण्याची परवानगी मिळावी, यासाठी जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा सुरू आहे.

संजय शेटे, अध्यक्ष, चेंबर ऑफ कॉमर्स

कोट

सकाळच्या टप्प्यात चार तासच दुकाने सुरू ठेवण्याचे बंधन जाचक आहे. ही अट शिथिल झाली पाहिजे. अन्यथा व्यापारी, दुकानदारासमोरील अडचणी पुन्हा वाढणार आहेत. दिवसभर दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी मिळणे आवश्यक आहे.

केतन तौटे, खाद्यतेल दुकानदार

--------