कुडीटेक जवळ अपघातात ट्रँक्टर चालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 17:38 IST2020-02-01T17:37:13+5:302020-02-01T17:38:27+5:30
डोक्याला ट्राँलीचा जोराचा मार बसल्याने तो खाली पडला व ट्राॅलीखाली सापडले व दूरवर फरफटत नेले. डोक्याला गंभिर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले . घटनेची नोंद मुरगुड पोलिसात झाली असुन पोलीस पुढील तपास करत आहेत.

सेनापती कापशी- लिंगनूर ( ता.कागल) रस्त्यावर झालेला ट्रँक्टरचा अपघात.. यामध्ये चालक जागीच ठार झाला
सेनापती कापशी - सेनापती कापशी - लिंगनूर रस्त्यावर कुडिटेक येथे टॅक्ट्रर अपघातात चालक ठार झाला.त्रिंबक हरी पूणे (वय ३०, रा.बीड) असे अपघातात ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. हि घटना आज सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. आज सकाळी नितिन शिवाजी सुर्यवंशी यांच्या मालकीचा टॅक्ट्रर (एम.बी. --०९ ईके ४९९२) घेऊन करड्याळ येथे ऊस भरण्यासाठी चालक हरि ञिबंक पुणे हा चालला होता . दरम्यान लिंगनुर कापशी रस्त्यावर कुडिटेक येथे सकाळी साडेनऊच्या सुमारास टॅक्ट्रर घेऊन आला असता. टॅक्ट्रर घसारत असणार्या रस्त्याला कमाणिजवळ थांबवुन ट्राँलिमध्ये काय वाजते ते वाकून पहात होता. ट्रँक्टर न्युट्रल केला असल्याने घसारतीला अचानक पुढे गेला. वाकून ट्राॅलित पहाणारे चालक हरी पुणे हा बाजूला सरकत असताना डोक्याला ट्राँलीचा जोराचा मार बसल्याने तो खाली पडला व ट्राॅलीखाली सापडले व दूरवर फरफटत नेले. डोक्याला गंभिर दुखापत झाल्याने ते जागीच ठार झाले . घटनेची नोंद मुरगुड पोलिसात झाली असुन पोलीस पुढील तपास करत आहेत.