शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

मसाई पठारचा पर्यटनदृष्ट्या विकास होणार

By admin | Updated: December 14, 2015 00:09 IST

पठाराचे सौंदर्य खुलणार

पन्हाळा : मसाई पठार पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत असताना निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी व गिरीभ्रमण करणाऱ्या पर्यटकांसाठी एक नवी पर्वणी उपलब्ध होणार आहे.पन्हाळगडापासून या विस्तीर्ण पठाराची मालिका सुरू होते. गिरीभ्रमण आणि ट्रेकिंगची आवड असणाऱ्या निसर्गप्रेमी मंडळींना मसाई पठारावरील भ्रमण एक वेगळीच अनुभूती मिळवून देते. याच पठारावर पन्हाळा-शाहूवाडी तालुक्यातील प्रसिद्ध मसाईदेवीचे मंदिर, पुरातन पांडवदरा या गुहांच्या समोरील पाण्याचे झरे अशा विस्तीर्ण पठारावरील ‘ईश्वर-म्हादू’ तलाव, आदी ठिकाणे पर्यटकांना निश्चितच मोहित करतील. ‘ईश्वर-म्हादू’ तलावावर स्थलांतरित पक्ष्यांचाही वावर असतो. त्यामुळे पक्षी निरीक्षण करणाऱ्या मंडळींना पक्षी निरीक्षणाचा आनंद लुटता येईल.छत्रपती शिवाजी महाराज याच मार्गाने पन्हाळा गडावरून विशाळगडाकडे गेले होते. त्यामुळे या पठाराला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. शिवरायांचे सुपुत्र युवराज संभाजी महाराजांचे या परिसरात काही काळ वास्तव्य होते. बाराद्वारी (बांदेवाडी) या ठिकाणी त्यांनी बराच काळ वास्तव्य केले होते. इतिहासाची आठवण करून देणारा हा परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत असल्याने पर्यटकांसाठी एक नवी पर्वणी उपलब्ध होणार आहे.पन्हाळगडाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, शाहू महाराजांच्या कल्पकतेतून साकारलेले ‘फोर्ट टी’ तयार करणारे चहाचे मळे, म्हाळुंगे गावातील खाली मुबलक पाणी असणारी विहीर, विस्तीर्ण आणि निसर्गाच्या विविध पैलूंची उधळण करणारा परिसर निसर्गप्रेमी पर्यटकांना पर्वणीच ठरणार आहे.मसाई पठार विकास प्रकल्पाची लवकरात लवकर सुरुवात व्हावी, अशी अपेक्षा मसाई कृषी सेवा संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब भोसले व उपाध्यक्ष पी. आर. भोसले यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)पठाराचे सौंदर्य खुलणारजैवविविधतेने नटलेल्या या मसाई पठारावर विविध औषधी वनस्पती व शेवाळ पावसाळ्याच्या हंगामात उगवून येतात. याची जपणूक होत असताना याचाही पर्यटकांना व वनस्पतीशास्त्र शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून त्याची जपणूक झाली पाहिजे, अशी मागणी पर्यावरण विद्यार्थ्यांनी केली आहे. निसर्गाचा समतोल राखूनच संपूर्ण मसाई पठारचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा, त्याचबरोबर छत्रपतींच्या पाऊलखुणा जपल्या जाव्यात, अशीही मागणी इतिहासप्रेमींनी केली आहे.