शहरं
Join us  
Trending Stories
1
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२६, आर्थिक लाभाची संधी, वाणी वर संयम ठेवावा लागेल
3
अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
4
मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे
5
एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर
6
साखरपुड्याला जाण्यासाठी ट्रकमध्ये बसले ६० जण; कंटेनरची धडक, १३ ठार
7
सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  
8
विधान परिषदेच्या १७ जागांसाठी रणसंग्राम; १८ जूनला निवडणूक होणार
9
वंदना सूर्यवंशी यांची विभागीय चौकशी प्रारंभ, मुंबई मुद्रांक जिल्हाधिकारी असताना ४९.३१ कोटींचे शासनाचे केले हाेते नुकसान
10
एसटी प्रवास महागणार, डिझेल दरवाढीचा प्रवाशांना माेठा फटका
11
एक डॉलर ९६.३५ रुपयांना...! खिसा सांभाळून ठेवा, महागाई पाेहाेचणार उच्चांकावर
12
बाजारात ट्रम्प यांचा ‘शेअर खेळ’, तीन महिन्यांत ३,७०० शेअर व्यवहार
13
संपादकीय: या कॅन्सरला ‘नीट’ रोखा, तीन दशकांत अक्षरशः खोबरे झाले
14
भारत-पाकमधून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी कुणाचे? 
15
राजनैतिक थकव्याने एकाकी इराणला भारताचा(च) आधार!
16
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
17
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
18
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
19
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
20
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: अल्पवयीन मुलावर अत्याचार; शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाला २० वर्षे कारावास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 12:12 IST

विश्वासघाताची गंभीर दखल

कोल्हापूर : अरबी आणि उर्दू शिकण्यासाठी येणाऱ्या १० वर्षीय मुलावर अत्याचार केल्याप्रकरणी शिकवणी घेणारा शिक्षक मुहमंदतल्हा मुस्तफा शेख (वय २७, रा. यादवनगर, कोल्हापूर) याला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल यांनी दोषी ठरवले. त्याला २० वर्षे सक्त कारावास, १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास तीन महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली. हा गुन्हा नोव्हेंबर २०२१ मध्ये घडला होता.

सहायक सरकारी वकील सुजाता इंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दौलतनगर येथील एका इमारतीत मुहमंदतल्हा शेख अरबी आणि उर्दूची शिकवणी घेत होता. याच्याकडे १० वर्षीय मुलगा शिकण्यासाठी जात होता. १८ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शेख याने अल्पवयीन मुलावर अत्याचार केले.

हा प्रकार कोणाला सांगितल्यास शिकवणीला घेणार नाही असे धमकावले. घाबरलेल्या पीडित मुलाने घरी जाऊन अत्याचाराची घटना वडिलांना सांगितली. वडिलांनी तातडीने राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक डी.टी. जौंजाळ यांनी तपास करून शेख याच्यावर आरोपपत्र दाखल केले होते.

ॲड. इंगळे यांनी न्यायालयात आठ साक्षीदार तपासले. उपलब्ध पुरावे, साक्षीदारांची साक्ष आणि ॲड. इंगळे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायाधीश अगरवाल यांनी आरोपी शेख याला दोषी ठरवले. बाललैंगिक प्रतिबंधक कायदा आणि बालहक्क कायद्यानुसार त्याला शिक्षा सुनावली. सहायक फौजदार नाझनीन देसाई यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले.

विश्वासघाताची गंभीर दखल

लहान मुले शिक्षकांवर विश्वास ठेवतात. आई-वडिलांप्रमाणे ते शिक्षकांना सन्मान देतात. याच विश्वासाच्या आधारे दहा वर्षीय मुलगा शेख याच्याकडे शिकवणीसाठी जात होता. मात्र, शिक्षकाने विद्यार्थ्याचा विश्वासघात केला. याची गंभीर दखल घेऊन आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस २० वर्ष सक्त कारावासाची शिक्षा सुनाविल्याची माहिती ॲड. इंगळे यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Tutor Gets 20 Years for Child Abuse Conviction

Web Summary : Kolhapur teacher, Muhamadtalah Sheikh, sentenced to 20 years for abusing a 10-year-old student. The court also imposed a fine of ₹10,000. The crime occurred in November 2021. The victim confided in his father, leading to the arrest and conviction.