आईच्या हत्येप्रकरणी शिक्षेचा उद्या निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:30 IST2021-07-07T04:30:58+5:302021-07-07T04:30:58+5:30

कोल्हापूर : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून आईचा निर्दयीपणे खून करत तिच्या शरीराचे तुकडे करून काळीज खाणाऱ्या ...

Tomorrow's verdict in mother's murder case | आईच्या हत्येप्रकरणी शिक्षेचा उद्या निर्णय

आईच्या हत्येप्रकरणी शिक्षेचा उद्या निर्णय

कोल्हापूर : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून आईचा निर्दयीपणे खून करत तिच्या शरीराचे तुकडे करून काळीज खाणाऱ्या नराधम मुलास जिल्हा व सत्र न्यायाधीश महेश जाधव यांनी दोषी ठरवले आहे. मंगळवारी शिक्षेबाबत दोन्ही बाजूनी मंगळवारी युक्तिवाद झाला. सरकारी वकील ॲड. विवेक शुक्ल यांनी माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. त्यामुळे फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली. उद्या, गुरुवारी शिक्षेबाबत निर्णय होणार आहे.

शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कावळा नाका परिसरात २८ ऑगस्ट २०१७ ला आरोपीने दारू पिण्यास पैसे दिले नाहीत. या रागातून क्रूरपणे आईचा खून केला. याबाबत शुक्रवारी (दि.२) सुनावणी झाली. त्यानंतर मंगळवारी शिक्षेबाबत दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केला. आरोपीचे वकील ॲड. विजय लांबोरे यांनी युक्तिवाद केला. आरोपी सुनील याने हात जोडून क्षमा याचना केली. मुलांच्या संगोपनासाठी दया दाखविण्यात यावी, अशी विनंती केली. सरकारी वकील ॲड. शुक्ल यांनी खटल्याचे वर्णन ‘दुर्मीळातील दुर्मीळ’ असे केले. मारेकऱ्याला फाशी हेच कठोर प्रायश्चित आहे, असेही युक्तिवादामध्ये त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Tomorrow's verdict in mother's murder case