शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
4
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
5
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
6
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
7
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
8
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
9
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
10
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
11
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
12
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
13
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
14
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
15
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
16
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
17
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
18
'पंतप्रधानांच्या घोषणेने देशात अस्वस्थता, सर्वपक्षीय बैठक तातडीने बोलवा'; शरद पवारांची प्रतिक्रिया
19
पाकिस्तानचा डबल गेम! अमेरिकेच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी इराणच्या विमानांना दिला आश्रय
20
Naivedya Ritual:देवाला नैवेद्य अर्पण करताना तुळशीपत्र का ठेवतात? तंत्रसार ग्रंथात मिळते 'हे' उत्तर!
Daily Top 2Weekly Top 5

अध्यादेश नसल्याने टोल बैठक रद्द

By admin | Updated: January 15, 2015 00:35 IST

बैठकीबाबत शहरात उत्सुकता : लवकरच नवीन तारीख जाहीर होणार

कोल्हापूर : कोल्हापूरच्या वादग्रस्त टोलप्रश्नी प्राथमिक चर्चा करण्यासाठी आज, बुधवारी मुंबईत मूल्यांकन समितीची होणारी पहिलीच बैठक अचानक रद्द करण्यात आली. मूल्यांकन समिती स्थापण्याबाबत निर्णय झाला तरी याबाबत नगरविकास मंत्रालयाकडून अध्यादेश जारी करण्यात आला नाही. अध्यादेश नसल्याने बैठकीतील निर्णयाबाबत कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यामुळे रद्द झालेली बैठक आता अध्यादेश काढल्यानंतर पुन्हा घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
टोल प्रश्नावर पर्याय सूचविण्यासाठी नेमलेल्या मूल्यांकन समितीचे अध्यक्ष व सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनात होणाऱ्या या पहिल्या बैठकीबाबत शहरात कमालीची उत्सुकता होती. मुंबईतील या बैठकीसाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री विजय देशमुख, आमदार राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके व अमल महाडिक, महापौर तृप्ती माळवी, आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी व पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, आदींना निमंत्रित करण्यात आले होते. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) उपाध्यक्षांनी समिती सदस्यांना काल, मंगळवारी रात्री उशिरा बैठक रद्दबाबत सदस्यांना कळविले. बैठकीत टोलच्या पर्यायावर प्राथमिक चर्चा तसेच प्रत्यक्ष प्रकल्पास भेट देण्याची तारीख निश्चित केली जाणार आहे. शहर टोलमुक्त करण्यासाठी बैठक हा पहिला टप्पा आहे. त्यामुळेच या बैठकीतील निर्णयाबाबत सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीसह शहरवासीयांना उत्सुकता होती. आता पुन्हा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात बैठक होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)

टोल रद्द करण्याबाबत जोरदार हालचाली सुरू झाल्याने शहरवासीयांत समाधानाचे वातावरण होते. मात्र, आजची बैठक अचानक रद्द केल्याने सरकारच्या भूमिकेबाबत संशय निर्माण होऊ लागला आहे. शिवसेना व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी कोल्हापूरला टोलमुक्त करण्याचे आश्वासन दिले आहे. फेब्रुवारीअखेर आश्वासन पूर्ण करण्याची जबादारी पार पाडावी. अन्यथा व्यापक जनआंदोलनाद्वारे अभिवचनाची आठवण करून द्यावी लागेल.
- निवास साळोखे, निमंत्रक - टोलविरोधी कृती समिती