शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’चा आज वर्धापनदिन सोहळा

By admin | Updated: August 20, 2015 00:51 IST

स्नेहमेळाव्याचे आयोजन : ‘ग्लोबल कोल्हापूरकर’ विशेषांकाचे उत्स्फूर्त स्वागत

कोल्हापूर : कोल्हापूरच्या समाजजीवनाचे महत्त्वाचे अंग बनलेल्या ‘लोकमत’चा आज, गुरुवारी अकरावा वर्धापनदिन सोहळा साजरा होत आहे. त्यानिमित्त येथील ताराबाई पार्कातील धैर्यप्रसाद हॉलमध्ये सायंकाळी पाच ते रात्री आठपर्यंत वाचक, हितचिंतक, जाहिरातदार व विक्रेत्यांचा स्नेहमेळावा होणार आहे. या स्नेहमेळाव्याचे उद्घाटन महापौर वैशाली डकरे व जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील यांच्या हस्ते होणार असून, यावेळी खासदार राजू शेट्टी, खासदार धनंजय महाडिक प्रमुख उपस्थित असतील.वर्धापनदिनानिमित्तचा विशेषांक सकाळी साडेनऊ वाजता करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या चरणी अर्पण केला जाणार आहे. सायंकाळी वाचक, हितचिंतक, जाहिरातदार, विक्रेत्यांचा स्नेहमेळावा होईल. महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या ‘लोकमत’ने वाचकांच्या विश्वासाच्या बळावर कोल्हापूरमध्ये मानाचे स्थान पटकाविले आहे. थेट पाईपलाईन, हद्दवाढ, उद्योग-व्यापार, अंबाबाई मंदिर, शिवाजी विद्यापीठ, चित्रनगरी, वाहतुकीची समस्या, आदी प्रश्नांवर ‘आता बस्स’च्या माध्यमातून ‘लोकमत’ने परखड भूमिका घेत लोकप्रतिनिधी व शासनाला जागे केले. त्यामुळे वर्षानुवर्षे खितपत पडलेल्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी हालचाली सुरू झाल्या. यातील बहुतांश प्रश्नांवर कार्यवाही सुरू झाली. काहींची सोडवणूक झाली. सडेतोड बातम्यांसह ‘सखी मंच’, ‘युवा मंच’ आणि ‘बाल मंच’च्या माध्यमातून ‘लोकमत’ सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमदेखील राबविते. लोकभावना आणि लोकरंजन यांचा मेळ घालीत ‘लोकमत’ कोल्हापूरचे एक सर्वसमावेशक व्यापक व्यासपीठ बनले आहे. ते असंख्य वाचकांचे आहे. तसेच ‘लोकमत’वर निर्व्याज प्रेम करणाऱ्यांचे आहे. पत्रकारितेची मूल्ये जपतानाच समाजातील बंधुभाव वाढीस लागावा, असा ‘लोकमत’चा प्रयत्न राहिला आहे. त्यामुळे वाचकांकडून ‘लोकमत’ला अतिशय उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्याची शिदोरी घेऊनच ‘लोकमत’ हा वर्धापनदिन सोहळा साजरा करीत आहे. (प्रतिनिधी)विशेषांकाचे उत्स्फूर्त स्वागतवर्धापनदिनानिमित्त ‘ग्लोबल कोल्हापूरकर’ हा विशेषांक प्रसिद्ध करण्यात येत आहे. कोल्हापूरकरांनी जगाच्या कानाकोपऱ्यांत आपल्या कार्यकर्तृत्वाने वेगळा ठसा उमटविला आहे. विविध क्षेत्रांत त्यांनी तेथे आपले पाय घट्ट रोवले आहेत. कोल्हापूरची माणसे जगभरात आहेत. त्यांची या विशेषांकाच्या माध्यमातून ‘लोकमत’ने ओळख करून दिली आहे. हा विशेषांक बुधवारपासून वाचकांच्या भेटीला आला आहे. याचे वाचकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. काहींनी विशेषांकातील लेख व्हॉट्स-अ‍ॅप, फेसबुकवर शेअर केले आहेत.स्नेहमेळाव्याची वेळ, स्थळवेळ : आज, गुरुवारी, सायंकाळी ५ ते रात्री ८स्थळ : धैर्यप्रसाद हॉल, ताराबाई पार्क, कोल्हापूर.