आज कोविशिल्डचा पहिला, तर कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:31 IST2021-09-16T04:31:08+5:302021-09-16T04:31:08+5:30

कोल्हापूर : बुधवारी महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशिल्डचे २३२३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले, तर आज, गुरुवारी १८ ...

Today I will give the first dose of Kovishield and the second dose of Kovacin | आज कोविशिल्डचा पहिला, तर कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देणार

आज कोविशिल्डचा पहिला, तर कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस देणार

कोल्हापूर : बुधवारी महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशिल्डचे २३२३ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले, तर आज, गुरुवारी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोविशिल्डचा पहिला डोस देण्यात येणार आहे.

लाभार्थ्यांनी पहिल्या डोसच्या लसीकरणासाठी कोविन पोर्टलवर ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले आहे अशांनीच फक्त महापालिकेच्या प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राकडे लसीकरण करण्यासाठी यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेऊन २८ दिवस झालेल्या व्यक्तींचे प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र पंचगंगा, कसबा बावडा व कदमवाडी येथील द्वारकानाथ कपूर दवाखाना या ठिकाणी लसीकरण करण्यात येणार आहे.

तसेच प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र सावित्रीबाई फुले, फिरंगाई, राजारामपुरी, पंचगंगा, कसबा बावडा, महाडिक माळ, आयसोलेशन, फुलेवाडी, सदर बाजार, सिद्धार्थनगर, मोरेमाने नगर, भगवान महावीर दवाखाना व कदमवाडी या केंद्रावर कोविशिल्डचे लसीकरण करण्यात येणार आहे.

Web Title: Today I will give the first dose of Kovishield and the second dose of Kovacin