शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

चाऱ्याअभावी शेतकऱ्यांवर पशुधन विकण्याची वेळ

By admin | Updated: June 3, 2015 01:00 IST

तीव्र टंचाई : शिरोळ तालुक्यात पशुखाद्यांसह चाऱ्याचे दर गगनाला

गणपती कोळी - कुरूंदवाड -बारमाही वाहणाऱ्या नद्यांमुळे शिरोळ तालुका सुजलाम् सुफलाम् बनला आहे. मुख्य पीक उसासह इतर सर्वच पिकांचे विक्रमी उत्पादन घेणारा येथील शेतकरी पशुधनातही आघाडीवर आहे. मात्र, ऊस गळिताचा हंगाम संपल्यापासून चाऱ्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. पशुखाद्यांबरोबर ओल्या चाऱ्याचे दरही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे चाऱ्याअभावी येथील शेतकऱ्यांना पशुधन विकण्याची वेळ येत आहे. तालुक्याला कृष्णा, पंचगंगा, वारणा व दुधगंगा याचारही नद्यांनी वेढा दिल्याने शेती ओलिताखाली आहे. मुबलक पाणी, सुपीक जमीन अन् कष्टाची तयारी यातून येथील शेतकरी काळ्या आईच्या पोटातून सोने पिकवित आहे. मुख्य पीक उसाबरोबरच भाजीपाला, फळभाजी, द्राक्ष, आदी पिकांचे विक्रमी उत्पादन घेऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम बनला आहे. आदर्शवत शेतीबरोबरच शेतीपूरक व्यवसाय म्हणून पशुधनातून दुग्ध व्यवसायातही आघाडीवर आहे.उसाला चांगला भाव मिळत असल्याने उसाचे क्षेत्र वाढले. त्याचा परिणाम ओल्या चाऱ्यावर झाला. ऊस गळीत हंगामात ओल्या चाऱ्याची मुबलकता असते. मात्र, हंगाम संपल्यानंतर उन्हाळ्यात चाऱ्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडे दुग्धजन्य जनावरांची संख्या जास्त असल्याने व शेतीमध्ये ओला चारा नसल्याने चाऱ्याविना जनावरांचे हाल होत आहे. सरकी पेंड, गोळी पेंड, गहू भुसा, कडबाकुट्टी या पशुखाद्यांचे दरही गगनाला भिडले आहेत. चारा बाजारात एक पेंडी उसाच्या चाऱ्याला शंभर ते सव्वासे रुपये, तर मूठभर गवताच्या पेंढीला १५ ते २० रुपये मोजावे लागत आहेत. दुग्ध व्यवसायातून बेरजेचे गणित मांडणाऱ्या शेतकऱ्यांचे महागडा चारा व पुशखाद्यामुळे गणितच चुकले आहे.शेतात उभा ऊस असला तरी या उसावर सेवा सोसायटी, बॅँकांचे भरमसाठ कर्ज घेतल्याने आपल्या जनावरांसाठी ऊस तोडण्याचे धाडसही होत नाही अन् चाऱ्याअभावी जनावरांचे हालही पाहवत नसल्याने आपल्या जनावराला बाजार दाखवून गोठा रिकामा करावा लागत आहे.