यूट्यूब पाहून तीन तरुणांनी उभारला बनावट नोटा छापण्याचा कारखाना! इचलकरंजीत छापा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 08:27 IST2025-08-16T08:26:52+5:302025-08-16T08:27:00+5:30

साहित्यासह सव्वादोन लाख रुपयांच्या बोगस नोटा जप्त

Three youths set up a factory to print fake notes in Kolhapur after watching YouTube | यूट्यूब पाहून तीन तरुणांनी उभारला बनावट नोटा छापण्याचा कारखाना! इचलकरंजीत छापा

यूट्यूब पाहून तीन तरुणांनी उभारला बनावट नोटा छापण्याचा कारखाना! इचलकरंजीत छापा

कोल्हापूर/इचलकरंजी : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून इचलकरंजी येथील मंगळवार पेठमधील बनावट नोटा छपाईच्या कारखान्यावर बुधवारी छापा टाकला. छाप्यात भारतीय चलनातील २ लाख २४ हजार २०० रुपये किमतीच्या हुबेहूब बनावट नोटा, ७० हजार ७०० रुपयांच्या बनावट नोटा तयार करण्यास वापरलेले साहित्य असा एकूण २ लाख ९४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी अनिकेत विजय शिंदे (२४, रा. इचलकरंजी), राज रमेश सनदी (१९, रा. इचलकरंजी), सोएब अमजद कलावंत (१९) यांना अटक झाली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस संतोष बरगे, प्रदीप पाटील यांना इचलकरंजीत नारायण टॉकीज परिसरात एक व्यक्ती बनावट नोटा चलनात आणत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लावून कारवाई केली.

कारवाईदरम्यान अनिकेत शिंदे याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता खिशात बनावट नोटा आढळल्या. चौकशीदरम्यान त्याने राहत्या घरात बनावट नोटा छापत असल्याचे सांगितले. यासाठी दोन सहकारी मदत करीत असल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.

रॅकेटची शक्यता

काही दिवसांपूर्वी गडहिंग्लज शहरातही बनावट नोटाचे प्रकरण उघड झाले होते. त्यानंतर आता इचलकरंजी शहरात बनावट नोटा छपाईचा छापखानाच सापडला आहे. यामुळे अशाप्रकारे बनावट नोटा छपाई करणे त्याची विक्री करणारे रॅकेट सक्रिय असल्याचा संशय पोलिसांना येत आहे. त्या दिशेने तपास करीत आहेत.

२,२४,२०० रुपयांच्या बनावट नोटा तयार करण्यासाठीचे साहित्य जप्त.

कमी श्रमात व कमी वेळेत जास्त पैसे मिळवायच्या उद्देशाने तिघा मित्रांनी एकत्र येऊन यू-ट्यूबवर नोटा छापण्याची माहिती घेतली. त्यानुसार साहित्याची जुळवाजुळव करून नोटा छापण्याचे काम सुरू केले. कार्डशिट पेपरवर नोट चिकटवून ती स्कॅनिंग करून त्याची प्रिंट काढणे, असे ते बनावट नोटा बनवत होते.

Web Title: Three youths set up a factory to print fake notes in Kolhapur after watching YouTube

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.