शहरं
Join us  
Trending Stories
1
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
2
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
3
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
4
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
5
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
6
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
7
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
8
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
9
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
10
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
11
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
12
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
13
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
14
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
15
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
16
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
17
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
18
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
19
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
20
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
Daily Top 2Weekly Top 5

इचलकरंजीत तीन हजारांचा गुटखा जप्त

By admin | Updated: August 2, 2014 00:27 IST

रात्री उशिरापर्यंत पंचनामा करून गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू

इचलकरंजी : येथील बालाजी बेकर्सजवळ एका दुकानवजा घरात छापा टाकून गावभाग पोलिसांनी सुमारे तीन हजार रुपयांचा वेगवेगळ्या कंपनीचा गुटखा जप्त केला. पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली असून, रात्री उशिरापर्यंत पंचनामा करून गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, गावभाग पोलीस ठाण्याचे निरीक्षक बी. एम. नलवडे यांना बालाजी बेकर्सजवळ असलेल्या राजू तनवाणी यांच्या दुकानवजा घरामध्ये वेगवेगळ्या कंपनीच्या गुटख्याचा साठा केला असल्याची माहिती मिळाली. त्यावरून फौजदार प्रज्ञा देशमुख यांनी पोलीस पथकासह त्याठिकाणी छापा टाकला. यामध्ये स्टार, आरएमडी, रजनीगंधा व मिक्स पानमसाला अशा कंपन्यांच्या गुटख्यांचे सुमारे तीन हजार किमतीचे पुडे मिळून आले. पोलिसांनी हा गुटखा जप्त केला असून, तनवाणी यांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई श्रीधर कांबळे, मदन मदाळे यांच्या पथकाने केली. (प्रतिनिधी)कारवाईनंतर गुटख्याच्या किमतीत वाढगेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी गुटखा विक्री करणाऱ्यांवर धाडी टाकून पोलिसांनी कारवाई केल्यामुळे शहरात गुटखा विक्री करणारे पानपट्टीधारक व खाणाऱ्यांत खळबळ उडाली आहे. याचा गैरफायदा घेत काहीजण चढ्या किमतीने गुटख्याची चोरून विक्री करीत आहेत. एरव्ही दहा रुपयांना मिळणारा गुटखा पंधरा रुपयांपर्यंत, तर चाळीस रुपयांचा गुटखा ७० रुपयास विकला जात आहे. विक्री करतानाही नेहमीचे ग्राहक व ओळखीच्या व्यक्तींनाच गुटखा विकला जात आहे.