कोल्हापूर : रस्त्यात दुचाकीवर केक ठेवून आरडाओरड करीत वाढदिवस साजरा करताना हटकल्यानंतर पोलिसाची कॉलर धरलेल्या तीन आरोपींना गुरुवारी लक्षतीर्थ वसाहतमधून धिंड काढली. यावेळी बघ्याची गर्दी झाली होती. पोलिसांनी त्यांना कान पकडलेल्या स्थितीत फिरविले. वाचा - कोल्हापुरात गुंडांनी कॉलर पकडून पोलिसाला केली धक्काबुक्की, रस्त्यात वाढदिवस करण्यावरून हटकल्याने घडला प्रकार
लक्षतीर्थ वसाहतीमधील सराईत गुंड सादिक पाटणकर, अवधूत गजगेश्वर, आदित्य भोजणे या तिघांनी सोमवारी मध्यरात्री पोलिसांच्या अंगावर धावून गेले होते. पाटणकर याने हवालदारास कॉलर पकडून धक्काबुक्की केली. पोलिसांनी तातडीने तिघांना अटक केली होती. गुरुवारी त्यांना लक्षतीर्थ वसाहतमधून फिरवले. त्यावेळी परिसरातील लोकांची मोठी गर्दी उसळली होती.
Web Summary : Three Kolhapur goons, arrested for assaulting a police officer who stopped their roadside birthday celebration, were paraded through Lakshatirtha Vasahat. The incident drew a large crowd.
Web Summary : कोल्हापुर में सड़क पर जन्मदिन मना रहे गुंडों को रोकने पर पुलिसकर्मी से मारपीट करने के आरोप में तीन आरोपियों को लक्षतीर्थ वसाहत में घुमाया गया। इस घटना से लोगों की भीड़ जमा हो गई।