कोल्हापूर : शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) पेपर फोडणाऱ्या रॅकेटची व्याप्ती वाढत आहे. राज्यातील पुणे, मुंबई येथील आणखी तीन आरोपींचा सहभाग या रॅकेटमध्ये उघड झाला आहे. या प्रकरणी आत्तापर्यंत २९ जणांवर गुन्हा दाखल केला असून, १८ जणांना अटक झालेली आहे. दरम्यान, पाटण्यासह राज्यातील आरोपींच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांची दोन पथके रविवारी रवाना झाली आहेत.टीईटी परीक्षेचा पेपर फोडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून कोल्हापूर पोलिसांनी सुरुवातीला २६ जणांवर गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार महेश भगवान गायकवाड (वय ४०, रा. कऱ्हाड) याच्या तपासात रोज नवीन माहिती समोर येत आहे. आत्तापर्यंत पाटणा येथील पाचजणांसह पुणे आणि मुंबई येथील तीन आरोपींचा समावेश झाल्याने आता या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या २९वर पोहोचली आहे.
या प्रकरणातील १६ जणांचे जामीन अर्ज कागल न्यायालयाने शुक्रवारी फेटाळले होते. मात्र आणखी दोघांनी जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. या दोघांच्या जामीन अर्जावर आज, सोमवारी सुनावणी होणार आहे.पुणे, मुंबईच्या संशयितांची भूमिका कायया रॅकेटमध्ये पुणे, मुंबई येथील नव्याने समोर आलेल्या संशयितांची नेमकी भूमिका काय, हे येत्या एक-दोन दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे. दरम्यान, त्यांना अटक करण्यासाठी एक पथक रविवारी रवाना झाले आहे.
Web Summary : The TET paper leak in Kolhapur widens, implicating suspects from Mumbai and Pune. Twenty-nine are now accused, with eighteen arrested. Police teams dispatched to Patna and other locations to apprehend further suspects involved in the racket.
Web Summary : कोल्हापुर में टीईटी पेपर लीक का मामला गहराया, मुंबई और पुणे के संदिग्ध शामिल। अब तक उनतीस आरोपी, अठारह गिरफ्तार। पुलिस टीमें पटना और अन्य स्थानों पर आरोपियों को पकड़ने के लिए रवाना।