Kolhapur Crime: व्हिडिओ कॉलवरून पिस्तूल दाखवत धमकावले; सराईत गुन्हेगाराला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 17:42 IST2026-03-04T17:42:15+5:302026-03-04T17:42:38+5:30

पाचगाव-गिरगाव रोडवर करवीर पोलिसांची कारवाई

Threatened by showing pistol over video call; Criminal arrested in Sarai | Kolhapur Crime: व्हिडिओ कॉलवरून पिस्तूल दाखवत धमकावले; सराईत गुन्हेगाराला अटक

Kolhapur Crime: व्हिडिओ कॉलवरून पिस्तूल दाखवत धमकावले; सराईत गुन्हेगाराला अटक

कोल्हापूर : सराईत गुन्हेगाराने व्हिडिओ कॉलवरून एका तरुणाला पिस्तूल दाखवत धमकावल्याची माहिती करवीर पोलिसांना मिळाली होती. त्याची शहानिशा करून पोलिसांनी सराईत गुन्हेगार विशाल बबन जाधव ऊर्फ मांगोरे (वय २९, सध्या रा. प्रगतीनगर, पाचगाव, मूळ रा. माळ गल्ली, कसबा बावडा, कोल्हापूर) याला अटक केली. त्याच्याकडून ७५ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल जप्त केले. ही कारवाई मंगळवारी (दि. ३) दुपारी पाचगाव-गिरगाव रोडवर केली.

करवीर पोलिस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल मांगुरे याने गेल्या आठवड्यात एका तरुणाला व्हिडिओ कॉल करून पिस्तूल दाखवत धमकावले होते. त्याची माहिती अंमलदार योगेश लोकरे यांना मिळाली होती. त्याची शहानिशा करून पोलिसांनी मांगुरे याच्यावर पाळत ठेवली. तो मंगळवारी दुपारी पाचगाव ते गिरगाव रोडवरील एका फार्महाऊसजवळ येणार असल्याची माहिती मिळताच सापळा रचून त्याला अटक केली.

अंगझडतीत त्याच्या कमरेला लावलेले गावठी पिस्तूल मिळाले. पोलिसांनी पिस्तूल जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक नाथा गळवे यांच्यासह अंमलदार योगेश लोकरे, बजरंग लाड, अक्षय पवार, लखन राजगुरू, रफिक आवळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

कमरेला पिस्तूल लावून दहशत

अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग असलेला मांगुरे हा गेल्या काही दिवसांपासून गावठी पिस्तूल कमरेला लावून फिरत होता. सणासुदीच्या दिवसात दहशत माजवण्याचा प्रयत्न त्याच्याकडून सुरू होता. त्यापूर्वीच पोलिसांनी त्याला अटक केली. एका ट्रकचालकाकडून पिस्तूल खरेदी केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. संबंधित ट्रकचालकाचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

Web Title : कोल्हापुर: वीडियो कॉल पर पिस्तौल दिखाने वाला कुख्यात अपराधी गिरफ्तार

Web Summary : कोल्हापुर पुलिस ने विशाल जाधव को वीडियो कॉल पर एक युवक को पिस्तौल से धमकाने के आरोप में गिरफ्तार किया। 75,000 रुपये की देशी पिस्तौल जब्त की गई। वह हथियार लहराकर त्योहारी सीजन में दहशत फैलाने की योजना बना रहा था।

Web Title : Kolhapur: Notorious Criminal Arrested for Brandishing Pistol on Video Call

Web Summary : Kolhapur police arrested Vishal Jadhav for threatening a youth with a pistol on a video call. A country-made pistol worth ₹75,000 was seized. He was planning to spread terror during the festive season by brandishing the weapon.