शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

‘ताराराणी’पेक्षा कमी जागा आल्या तरी महापौर भाजपचाच

By admin | Updated: August 30, 2015 00:41 IST

चंद्रकांतदादा पाटील : भाजपच्या सक्रिय सदस्यांच्या बैठकीत मार्गदर्शन

कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत भाजप-ताराराणी आघाडीची सत्ता आल्यावर जागा जरी कमी आल्या तरी भाजपचाच महापौर होईल, असे संकेत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शुक्रवारी येथे दिले. शाहू स्मारक भवन येथे भाजपच्या शंभर सक्रिय सदस्यांची बैठक झाली. प्रमुख उपस्थिती प्रदेश सरचिटणीस रवींद्र भुसारी यांची होती. यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, भाजपला कमी जागा मिळाल्या तरी महापौर भाजपचाच होईल, हे ताराराणी आघाडीशी वाटाघाटी करताना ठरले आहे. ताराराणी आघाडीच्या सर्व उमेदवारांसाठी एकच चिन्ह मिळावे, असे प्रयत्न सुरू आहेत. जर तसे झाले नाही, तर ताराराणी आघाडीचे उमेदवारही कमळ चिन्हावर निवडणूक लढविण्याचा विचार होऊ शकतो. शिवसेनेशी युती तुटल्यानंतर भाजपने ताराराणी आघाडीशी हातमिळवणी केली. २०१० चा अपवाद वगळता ताराराणी आघाडी नेहमी सत्तेत आहे. ताराराणी आघाडीचे एकाचवेळी ६० नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे ताराराणी आघाडीसोबत जाण्याचा निर्णय आपण घेतला आहे. परंतु या आघाडीशी युती म्हणजे कॉँग्रेसशी युती, असा अर्थ होत नाही. ताराराणी आघाडीचे अध्यक्ष स्वरूप महाडिक कोणत्याही पक्षात नाहीत. तर अमल महाडिक हे भाजपचे आमदार आहेत. मंत्री पाटील पुढे म्हणाले, राज्यात विधानसभा जिंकताना हेच नियोजन केले होेते. सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले. संघाला राज्यात आणि देशात काय हवे आहे, याची जाण असलेल्या नेत्यांकडे सत्ता आहे. ‘हृदय’ व ‘अमृत’ योजनेतून शहराला ७०० कोटींच्या आसपास निधी मिळेल. त्यामुळे शहराच्या विकासासाठी महापालिकेत सत्ता येणे आवश्यक आहे. रवींद्र भुसारी म्हणाले, परिश्रमाशिवाय काहीही हाती लागत नाही. आजपासून निवडणुकीचा शंख फुंकला असून, कार्यकर्त्यांनी लढविण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी काम करायचे आहे. जनसंघाच्या काळात आपल्या उमेदवाराची ‘डिपॉझिट’ वाचली, तर आनंद व्हायचा, पण ही स्थिती आता बदलली आहे. नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणूक काळात ८ महिन्यांत देशात ५४३२ ठिकाणी प्रचार कार्यक्रम घेतले होते. याच धडाक्याने महापालिका निवडणुकीत काम करायचे आहे. यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, नगरसेवक आर. डी. पाटील, नगरसेवक सुभाष रामुगडे, जिल्हा सरचिटणीस राहुल चिकोडे, जिल्हा सरचिटणीस अशोक देसाई, उमाताई खापरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)