ज्यांना मोठे केले, तेच वेगळी चूल मांडताहेत

By Admin | Updated: September 7, 2015 22:26 IST2015-09-07T22:26:48+5:302015-09-07T22:26:48+5:30

के. पी. पाटील : वासनोलीत राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा

Those who have raised them, they are making different quarrels | ज्यांना मोठे केले, तेच वेगळी चूल मांडताहेत

ज्यांना मोठे केले, तेच वेगळी चूल मांडताहेत

कडगाव : राजकारण आणि समाजकारण करीत असताना सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून आपण कार्यकर्त्यांना मोठे करण्याचे काम करतो. आता तेच लोक वेगळी चूल मांडण्याची भाषा करीत आहेत, असे प्रतिपादन माजी आमदार के. पी. पाटील यांनी केले.
वासनोली (ता. भुदगरड) येथे पश्चिम भुदरगड राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष पंडितराव केणे, ‘बिद्री’चे संचालक धनाजी देसाई, पंचायत समिती सदस्य विश्वनाथ कुंभार, ‘गोकुळ’चे संचालक विलासराव कांबळे, सुनील कांबळे उपस्थित होते.के. पी. पाटील म्हणाले, पश्चिम भुदरगडच्या विकासासाठी आपण कोट्यवधींचा निधी दिला; मात्र काही कार्यकर्त्यांनी स्वार्थासाठी त्याचा उपयोग केला. ‘बिद्री’च्या चिमणीसाठी विरोधकांनी कितीही आटापिटा केला तरी तीन तालुक्यांतील स्वाभिमानी सभासद आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहतील. विलास कांबळे म्हणाले, पक्षाच्या जिवावर मोठे झालेले लोक जाती, धर्माचा आधार घेऊन पक्षाला आणि कार्यकर्त्यांना बदनाम करीत आहेत. त्यांच्यापासून कार्यकर्त्यांनी सावध राहावे. देसाई यांनी भुदरगडच्या पश्चिम भागात राष्ट्रवादीत काही लोक बुद्धिभेदाचे राजकारण करून आपली पोळी भाजत आहेत. तसेच कार्यकर्त्यांना वेठीस धरण्याचे काम करीत आहेत. कार्यकर्त्यांनी संभ्रमात न पडता पक्षाच्या पाठीशी राहावे. आपण त्यांना संरक्षण देऊ, अशी ग्वाही दिली.मानसिंग पाटील, प्रकाश डेळेकर, बाळासाहेब भालेकर, के. ना. पाटील, पांडुरंग पाटील, दिनकर रेपे, काशीनाथ देसाई, नामदेव पाटील, बाळासाहेब कोटकर, शिवाजी पाटील, नंदकुमार ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केली. (वार्ताहर)

Web Title: Those who have raised them, they are making different quarrels