सिरसंगीच्या भोंदूबाबाचा कसून तपास सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:37 IST2020-12-14T04:37:50+5:302020-12-14T04:37:50+5:30

सिरसंगी (ता. आजरा) येथील बाळू दळवी याने अत्याचार केल्याची तक्रार शनिवारी (दि.१२) पीडित महिलेने नेसरी पोलिसांत दिली होती. यामुळे ...

A thorough investigation of Sirsangi's Bhondubaba is underway | सिरसंगीच्या भोंदूबाबाचा कसून तपास सुरू

सिरसंगीच्या भोंदूबाबाचा कसून तपास सुरू

सिरसंगी (ता. आजरा) येथील बाळू दळवी याने अत्याचार केल्याची तक्रार शनिवारी (दि.१२) पीडित महिलेने नेसरी पोलिसांत दिली होती. यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून, या भोंदूबाबाकडे भक्त म्हणून जाणाऱ्या लोकांसह खेडोपाड्यात याची चर्चा दिवसभर सुरू होती.

नेसरी पोलिसांनी साक्षीदारांची सोमवारी माहिती घेतली. तसेच त्यांचे जबाब नोंदविण्यात आल्याचे सांगण्यात आले, तर दुसरा संशयित लक्ष्मण सुतार याचाही शोध घेण्यात आला; पण तो सापडला नाही. तसेच सावंतवाडी येथील त्या दोन संशयितांची नावे अजून निष्पन्न झाली नसल्याने त्या दृष्टीनेही तपास सुरू आहे. दळवीच्या मोबाईलचे कॉल डिटेल्स तपासले जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. बाळू दळवीच्या जाळ्यात आणखी काही लोक फसले आहेत का याचाही तपास सुरू आहे.

Web Title: A thorough investigation of Sirsangi's Bhondubaba is underway