शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘राजाराम’चा ५० चा तिसरा हप्ता लवकरच

By admin | Updated: September 5, 2014 23:27 IST

महादेवराव महाडिक : को-जनरेशन प्रकल्प कारखाना स्वत: राबविणार

कसबा बावडा : ऊस उत्पादकांच्या आर्थिक अडचणींचा विचार करून एफ.आर.पी.पेक्षा जादा १०० चा दुसरा हप्ता दिला असून, ताळेबंदाप्रमाणे एकूण ऊस दर २४०० प्रतिटन बसत असल्याने उर्वरित ५० रुपये लवकरच दिले जातील, असे प्रतिपादन आमदार महादेवराव महाडिक यांनी केले.कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते अध्यक्षपदावरून बोलत होते. सभेत विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.महाडिक म्हणाले, सन २०१३-१४ मध्ये साखर आयात केल्याने देशातील साखरेचे भाव उतरले. त्यामुळे कारखान्यांना मोठा तोटा झाला. साखर उद्योगास प्रायॉरिटी सेक्टरचा दर्जा देऊन पतपुरवठा चार ते सहा दराने करावा, आयात-निर्यात धोरण दीर्घकालीन ठेवावे, साखर निर्यातीपोटी केंद्र व राज्य शासनाचे अनुदान वेळेत मिळावे, इथेनॉलच्या निर्मितीस चालना द्यावी, तसेच साखर उद्योगास आयकरातून वगळल्यास या उद्योगापुढील अडचणी काही प्रमाणात कमी होतील. महाडिक म्हणाले, बांधा, वापरा आणि हस्तांतर करा (बीओटी) या तत्त्वावर को-जनरेशन प्रकल्प उभारणीसाठी टेंडर्स मागविण्यात आली होती; परंतु त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कारखाना आता स्वत:च हा प्रकल्प उभारण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यास परवानगी मिळावी म्हणून तसा प्रस्ताव साखर आयुक्तांकडे पाठविला आहे. १२ ते १५ मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प झाल्यास चांगला दर देता येईल.अध्यक्ष दिलीप पाटील यांनी स्वागत करून कामकाजाचा आढावा घेतला. विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन मुख्य सल्लागार पी. जी. मेढे यांनी केले. उपाध्यक्ष लहू शामराव पाटील यांनी आभार मानले. प्रभारी कार्यकारी संचालक आर. सी. पाटील, माजी महापौर शिवाजीराव कदम, नगरसेवक नानासो कदम, कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव माने, वडगाव बाजार समितीचे सभापती शहाजी पाटील, जयसिंग खामकर, के. पी. चरापले, आदींसह सभासद उपस्थित होते. (प्रतिनिधी )