शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

Kolhapur: नांगनूरमध्ये सेवानिवृत्त पोलिसाचे घर फोडले, चोरट्यांनी १५ तोळे दागिन्यासह रोकड लांबवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 13:30 IST

तपासासाठी कोल्हापूरहून श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण केले आहे

राम मगदूम गडहिंग्लज : ऑपरेशनसाठी रुग्णालयात दाखल झालेल्या सेवानिवृत्त पोलिसाचे घर अज्ञात चोरट्याने फोडले. लोखंडी तिजोरी ठेवलेले सुमारे १५ तोळ्यांचे दागिने व वीस हजाराची रोकड लांबवली. नांगनूर ( ता. गडहिंग्लज) येथील या घटनेमुळे तालुक्याच्या पूर्व भागात खळबळ उडाली.मिळालेली माहिती अशी, नागनूर येथील नाना निंगाप्पा बामणे हे मुंबई पोलीस दलाच्या सेवेत होते. सेवानिवृत्तीनंतर ही ते मुंबई येथेच वास्तव्याला असून त्यांना दोन मुली आहेत. एकीचा विवाह झाला असून दुसरी मुंबई येथे नोकरी करते. अलिकडेच त्यांनी गावातील ग्रामपंचायतीच्या समोर नवीन घर बांधले आहे. मे महिन्यात झालेल्या श्री. बसवाण्णा देवाच्या यात्रेसाठी पत्नी नंदा यांच्यासह ते गावी आले होते.दरम्यान, सोमवारी (९) हर्नियाच्या ऑपरेशनसाठी ते येथील एका खासगी दवाखान्यात दाखल झाले आहेत.त्यामुळे घरी कुणीही नव्हते. सोमवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे लोखंडी गज उचकटून घरात प्रवेश केला. तिजोरीत ठेवलेले सुमारे १५ तोळ्यांचे दागिने, चांदीच्या वस्तू, व २० हजाराची रोकड लंपास केली.

घटनास्थळी पोलिस उपाधीक्षक रामदास इंगवले, पोलिस निरीक्षक अजयकुमार सिंदकर, उपनिरीक्षक विजय घाटगे, पोलिस पाटील ज्ञानदेव मोकाशी यांनी भेट दिली. बामणे यांच्या पत्नी नंदा यांच्या फिर्यादीवरून गडहिंग्लज पोलिसांत चोरीची नोंद झाली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपासासाठी कोल्हापूरहून श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण केले आहे.

खिडकीचे लोखंडी गज उचकटले मंगळवारी सकाळी शेजारच्या नागरिकांना बामणे यांच्या घराच्या खिडकीचे लोखंडी गज उचकटलेले निदर्शनास आले.त्यांच्याकडुन माहिती मिळताच नंदा यांनी घराकडे धाव घेतली.कुलूप काढून घराचा दरवाजा उघडल्यानंतर चोरी झाल्याचे उघडकीस आले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीPoliceपोलिस