Kolhapur: लक्ष्मीपुरीत चोरट्यांनी धान्य दुकाने फोडली, दीड लाखाची रोकड लंपास 

By उद्धव गोडसे | Published: December 16, 2023 05:40 PM2023-12-16T17:40:01+5:302023-12-16T17:41:12+5:30

कोल्हापूर : लक्ष्मीपुरी येथील धान्य बाजारात चोरट्याने दुकानाचा पत्रा उटकटून आतील एक लाख ५१ हजार रुपयांची रोकड लंपास केली. ...

Thieves broke into grain shops in Lakshmipuri in Kolhapur, looted cash worth one and a half lakh | Kolhapur: लक्ष्मीपुरीत चोरट्यांनी धान्य दुकाने फोडली, दीड लाखाची रोकड लंपास 

Kolhapur: लक्ष्मीपुरीत चोरट्यांनी धान्य दुकाने फोडली, दीड लाखाची रोकड लंपास 

कोल्हापूर : लक्ष्मीपुरी येथील धान्य बाजारात चोरट्याने दुकानाचा पत्रा उटकटून आतील एक लाख ५१ हजार रुपयांची रोकड लंपास केली. हा प्रकार शुक्रवारी (दि. १५) रात्री नऊ ते शनिवारी (दि. १६) सकाळी नऊच्या दरम्यान घडला. याबाबत निखिल वैभव सावर्डेकर (वय ३२, रा. राजारामपुरी, सहावी गल्ली, कोल्हापूर) यांनी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीपुरीतील धान्य गल्लीत सावर्डेकर आणि चिमटे यांची होलसेल धान्य विक्री दुकाने शेजारी-शेजारी आहेत. नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री दुकाने बंद करून ते घरी गेले. सकाळी दुकान उघडण्यासाठी गेले असता, निखिल सावर्डेकर यांना दुकानाचा पत्रा उचकटल्याचे दिसले. आत जाऊन पाहणी केली असता, टेबलच्या ड्रॉवरमधील आणि तिजोरीतील एक लाख ४० हजार रुपयांची रोकड चोरीस गेल्याचे लक्षात आले. त्यांनी ही रक्कम धान्य व्यापाऱ्यास देण्यासाठी ठेवली होती. 

दरम्यान, शेजारचे महादेव कृष्णा चिमटे यांच्याही दुकानाचा पत्रा उटकटून चोरट्यांनी ११ हजार रुपये लंपास केल्याचे लक्षात आले. चोरी झाल्याची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात यश आले नाही.

Web Title: Thieves broke into grain shops in Lakshmipuri in Kolhapur, looted cash worth one and a half lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.