शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

‘एलबीटी’ची नियमबाह्य वसुली नको

By admin | Updated: July 30, 2014 00:31 IST

न्यायालयाचा आदेश : महापालिकेकडून विनाकारण त्रास; व्यापारीमित्र संघटनेची माहिती

कोल्हापूर : शहरातील व्यापाऱ्यांवर स्थानिक व्यापारी कर कायद्यातील तरतुदींच्या बाहेर जावून कोणतीही कारवाई करण्यास, कोल्हापूर दिवाणी न्यायालयाने मनाई केली आहे. तसेच न्यायालयाने यापूर्वीच दिलेला आदेश यापुढेही अंतिम निकालापर्यंत लागू राहणार असल्याची माहिती व्यापारीमित्र संघटनेचे अ‍ॅड. अरविंद मेहता आणि व्यापारी प्रदीपभाई कापडिया यांनी आज, मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.मेहता म्हणाले, कोल्हापूर महानगरपालिकेकडून बेकायदेशीरपणे एलबीटी वसुलीसाठी कारवाई सुरु होती. याबाबत व्यापाऱ्यांच्यावतीने कोल्हापुरातील दिवाणी न्यायालयात २४ मार्च २०१४ ला दावा दाखल करण्यात आला. त्यावर २८ मार्च रोजी न्यायालयाचा आदेश झाला. यात व्यापाऱ्यांनी दाखल केलेल्या दाव्यास महापालिकेने पुढील तारखेपर्यंत वादी ॅकिंवा शहरातील व्यापाऱ्यांच्या विरोधात स्थानिक व्यापारी कर कायद्यातील एलबीटी तरतुदींच्या बाहेर जावून कोणतीही कारवाई करू नये, असा आदेश महापालिकेला दिला. असे असतानाही जुलैमध्ये महापालिकेने शहरातील सुमारे १५०० व्यापारी, उद्योजकांना त्यांचे बँक खाते सील करण्याबाबत तसेच अन्य स्वरूपातील नोटिसा पाठविल्या. त्यानंतर व्यापारी मित्र संघटनेने ९ जुलै रोजी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली. त्यानंतर १४, १७ आणि १९ जुलै रोजी या व्यापाऱ्यांना नोटिसा पाठवून सुनावणीस बोलविले होते. या नोटीसप्रमाणे व्यापाऱ्यांच्या बाजूने न्यायालयात म्हणणे मांडण्यात आले. याबाबत न्यायालयाने यापूर्वीच दिलेला आदेश यापुढेही अंतिम निकालापर्यंत लागू राहील, असा आदेश दिला.कापडिया म्हणाले, महापालिका व्यापारी, उद्योजकांना वारंवार बेकायदेशीररित्या नोटिसा, एसएमएस आणि प्रत्यक्ष दुकानात जावून त्रास देणे सुरू केले. त्याबाबत व्यापारी मित्र संघटनेच्या माध्यमातून व्यापारी, उद्योजकांनी कायदेशीररित्या लढाई करण्याचे ठरविले. त्याची आता सुरुवात आहे. एलबीटी आम्ही देत आहोत. मात्र, महापालिकेकडून जी बेकायदेशीर वसुली सुरू आहे. त्याला विरोध करण्यासाठी आम्ही न्यायालयीन लढा दिला.पत्रकार परिषदेस कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष रविंद्र तेंडुलकर, अजित कोठारी, विजय मंत्री, वैभव सावर्डेकर, श्रीनिवास मिठारी, संजय शेटे, प्रदीप व्हरांबळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)महानगरपालिकेकडून बेकायदेशीरपणे एलबीटी वसुलीसाठी कारवाई व्यापाऱ्यांच्यावतीने कोल्हापुरातील दिवाणी न्यायालयात दावा दाखल न्यायालयाचा एलबीटी तरतुदींच्या बाहेर जावून कोणतीही कारवाई करू नये, असा आदेश असे असतानाही महापालिकेच्या शहरातील सुमारे १५०० व्यापाऱ्यांना नोटीसा