दलित वस्ती निधीच्या वाटपाशिवाय राजीनामा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:54 IST2021-02-05T06:54:32+5:302021-02-05T06:54:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : दलित वस्ती निधीच्या वाटपावरून पालकमंत्री सतेज पाटील आणि समाजकल्याण समिती सभापती स्वाती सासने यांच्यातील ...

There is no resignation without distribution of Dalit Vasti Fund | दलित वस्ती निधीच्या वाटपाशिवाय राजीनामा नाही

दलित वस्ती निधीच्या वाटपाशिवाय राजीनामा नाही

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : दलित वस्ती निधीच्या वाटपावरून पालकमंत्री सतेज पाटील आणि समाजकल्याण समिती सभापती स्वाती सासने यांच्यातील वाद चिघळण्याची शक्यता आहे. जोपर्यंत हे योग्य वाटप होत नाही तोपर्यंत राजीनामा देणार नाही, अशी भूमिका सासने यांनी घेतली आहे.

गेल्या महिन्यापासून दलित वस्तीचे ३६ कोटी रुपये वितरण करण्यासाठी बैठकांवर बैठका सुरू आहेत. सदस्य आणि सभापतींमध्येही यावरून मतभेद होते. स्वत: सासने यांनी आपल्यासाठी जादा निधी घेतल्याची तक्रार होती. त्यामुळे पालकमंत्री पाटील यांनी यात हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला. परंतु, या हस्तक्षेपाचे भांडवल करत सदस्यांनी जिल्हा समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांच्यावर राग काढण्याचा प्रयत्न केला.

अखेर पालकमंत्री पाटील यांनी सर्वांना बोलावून यातून तोडगा काढण्याचा निर्णय घेतला. याचवेळी त्यांनी सासने यांना जादा निधी घेण्यापासून रोखले. तेव्हाही सासने यांनी या निधीच्या वाटपाचा अधिकार समाजकल्याण समितीचा असून, सभापती म्हणून जिल्ह्यातील आलेल्या कार्यकर्त्यांना निधी देण्यासाठी सभापतींना जादा निधीची गरज ठामपणे सांगितली होती. याला पंधरा दिवस उलटून गेले तरी अजूनही यातून तोडगा निघालेला नाही. अशातच त्यांनी आता जोपर्यंत निधीचे योग्य वितरण होणार नाही तोपर्यंत राजीनामा देणार नाही, अशी ताठर भूमिका घेतली आहे.

Web Title: There is no resignation without distribution of Dalit Vasti Fund