शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

राज्याला ६ महिने पुरेल इतकी साखर कोल्हापुरात पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:16 IST

राजाराम लोंढे लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्याला ६ महिने पुरेल इतकी साखर एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गोडावूनमध्ये ...

राजाराम लोंढे

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राज्याला ६ महिने पुरेल इतकी साखर एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गोडावूनमध्ये पडून आहे. मागील हंगामात उत्पादीत झालेल्या साखरेपैकी ६५ टक्के म्हणजेच ११ लाख ४१ हजार टन साखर शिल्लक असल्याने कारखान्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. सर्वाधिक साखर १ लाख ५८ हजार टन ‘जवाहर’ कारखान्याकडे असून ‘कुंभी’कडे ९१ हजार टन साखर पडून असून, हंगाम तोंडावर आल्याने या साखरेचे करायचे काय? असा प्रश्न कारखान्यांसमोर आहे.

गेले तीन-चार हंगाम साखर कारखानदारी दुष्टचक्रातून जात आहे. साखरेचा दर प्रतिक्विंटल ३,१०० आणि ऊसाला प्रतिटन ३ हजार रुपये दर असल्याने गणित बिघडल्याने कारखानदारांची दमछाक होत आहे. मागील २०२०-२१ हा हंगाम सुरु करण्यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील २१ कारखान्यांकडे ६ लाख ७७ हजार ५५६ टन साखर शिल्लक होती. त्यामध्ये १७ लाख ५५ हजार ७७० टन साखरेचे उत्पादन झाले. त्यातून १ ऑक्टोबर २०२० ते ३० जून २०२१पर्यंत १२ लाख ९२ हजार २३८ टन साखरेची विक्री झाली. त्यामुळे आता तब्बल ११ लाख ४१ हजार ८७ टन साखर कारखान्यांच्या गोडावूनमध्ये पडून आहे. राज्याला ३० ते ३५ लाख टन साखर वर्षाला लागते. त्यामुळे राज्याला किमान सहा महिने पुरेल इतकी साखर सध्या कोल्हापुरात पडून आहे.

प्रत्येक कारखान्याला अडीच कोटी व्याजाचा भुर्दंड

साखर गोडावूनमध्ये पडून असली तरी त्यावर व्याज सुरु आहे. पोत्याला (१०० किलो) दिवसाला १ रुपया व्याजापोटी द्यावा लागतो. त्यामुळे केवळ व्याजावर प्रत्येक कारखान्याला किमान दोन ते अडीच कोटींचा भुर्दंड पडतो. बँकांकडे शिल्लक असलेली १० टक्के उचल ही व्याजपोटीच जाते.

दीड लाख टन साखर उघड्यावर

दोन वर्षांच्या साखरेने गोडावून फुल्ल झाल्याने मागील हंगामात कारखान्यांनी उघड्यावर साखर ठेवली होती. अनेक कारखान्यांची या पावसातही साखर तशीच आहे. साधारणत: दीड लाख टन साखर उघड्यावर असून, पावसामुळे त्याचे खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे.

निर्यात कोटा २५ लाख टन वाढवणे गरजेचे

केंद्राने राज्यासाठी साखरेचा ६० लाख टन निर्यात कोटा दिला होता. तो संपला असून, साखरेची गोडावून मोकळी करण्यासाठी किमान २५ लाख टन निर्यात कोटा देण्याची मागणी कारखान्यांकडून होत आहे.

कोट-

साखरेची समस्या पाहता, १५० रूपये वाहतूक अनुदानाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या साखर २,७५० रुपये क्विंटल आहे. केंद्राने साडेतीनशे रुपये अनुदान दिले तर बऱ्यापैकी मार्ग निघू शकतो.

- पी. जी. मेढे (साखर उद्योगातील तज्ञ)

कारखानानिहाय शिल्लक साखर टनात -

कारखाना साखर

वारणा ६५,१४०

भोगावती ५५,७२२

राजाराम ४०,६४७

शाहू ७२,६९६

दत्त, शिरोळ ८३,२८२

बिद्री ७४,७८०

नलवडे, गडहिंग्लज ३४,६९७

जवाहर १,५८,५८२

मंडलिक, हमीदवाडा ३७,७७३

कुंभी ९१,७९२

पंचगंगा ५९,०५७

शरद ४४,१७९

गायकवाड, सोनवडे ७,१३६

डी. वाय. पाटील ३०,१५३

गुरुदत्त ४८,८४०

इको केन १८,०२५

हेमरस ४०,६३४

रिलायबल २०,२७५

घोरपडे ४७,५३१

डालमिया ७४,५३७

इंदिरा २९,७४१

एकूण ११,४१,०८७