तीन तालुक्यांत नवा कोरोना रुग्ण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:25 IST2021-09-03T04:25:49+5:302021-09-03T04:25:49+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. गुरुवारी जिल्ह्यात नव्या १०४ रुग्णांची भर ...

There are no new corona patients in the three talukas | तीन तालुक्यांत नवा कोरोना रुग्ण नाही

तीन तालुक्यांत नवा कोरोना रुग्ण नाही

कोल्हापूर : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. गुरुवारी जिल्ह्यात नव्या १०४ रुग्णांची भर पडली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. सध्या १३८९ रुग्णांवर उपचार सुरू असून गेल्या २४ तासांत १४१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तीन तालुक्यांत आणि पाच नगरपालिका कार्यक्षेत्रात नवा एकही रुग्ण नोंदवण्यात आलेला आहे.

कोल्हापूर शहरात २७, शिरोळ तालुक्यात १३ तर करवीर, हातकणंगले तालुक्यात प्रत्येकी १२ नागरिकांना कोरोनाची नव्याने लागण झाली आहे. आर. के. नगरमधील ६९ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला असून, कागल तालुक्यातील सावर्डे येथील ५५ वर्षांच्या पुरुषाचा मृत्यू झाला आहे. पाच हजारांहून अधिक चाचण्या झाल्या आहेत.

Web Title: There are no new corona patients in the three talukas