कोरोनामुळे एकही मृत्यू नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:30 IST2021-09-10T04:30:01+5:302021-09-10T04:30:01+5:30

कोल्हापूर शहरात ३५, हातकणंगले तालुक्यात ११, तर करवीर तालुक्यात आठ नवे रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. चंदगड आणि गगनबावडा तालुक्यात ...

There are no deaths due to corona | कोरोनामुळे एकही मृत्यू नाही

कोरोनामुळे एकही मृत्यू नाही

कोल्हापूर शहरात ३५, हातकणंगले तालुक्यात ११, तर करवीर तालुक्यात आठ नवे रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. चंदगड आणि गगनबावडा तालुक्यात नवा एकही रुग्ण आढळलेला नाही. अन्य तालुके आणि नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रातही किरकोळ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागरी आणि ग्रामीण भागातूनही कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण घटल्याचे स्पष्ट होत आहे.

गेल्या पंधरा दिवसांपूर्वीपासून मृत्यूचे प्रमाणही कमी झाले असून रोज दोन किंवा तीन मृत्यूच्या घटना घडत होत्या. गुरुवारी संध्याकाळी संपलेल्या २४ तासांत एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. एकही मृत्यू न होण्याची या दहा दिवसांतील ही दुसरी वेळ असून हा मोठा दिलासा मानला जातो.

चौकट

दक्षता घ्यायलाच हवी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जरी रुग्णसंख्या आणि मृत्युसंख्या घटली असली तरी काळजी घेण्याची गरज आहे. याच दरम्यान सर्वत्र गर्दी होण्याची शक्यता असून ज्येष्ठ नागरिकांचेही आरोग्य जपण्याची गरज आहे.

Web Title: There are no deaths due to corona