शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

...तर शेट्टी, सदाभाऊंच्या घरांवर मोर्चा

By admin | Updated: August 20, 2016 00:11 IST

शेतकरी संघटना : ४५ रुपयांसाठी साखर सहसंचालकांना निवेदन

कोल्हापूर : ‘शेतकऱ्यांचे नेते’ म्हणणाऱ्यांनी एफआरपीचे तुकडे पाडून शेतकऱ्यांची दिशाभूल केली, हंगाम संपून सहा महिने उलटले तरी ४५ रुपयांवर तोंड उघडण्यास हे नेते तयार नाहीत. दहा दिवसांत हे पैसे मिळाले नाही तर साखर सहसंचालक कार्यालयास टाळे ठोकूच, पण खासदार राजू शेट्टी व राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या घरांवर मोर्चा काढू, असा इशारा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पी. जी. पाटील व युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. माणिक पाटील यांनी दिला. गत गळीत हंगामातील एफआरपीमधील ४५ रुपये द्यावे, साखरेचे दर वाढल्याने आणखी पाचशे रुपये दर द्यावा, या मागणीसाठी शुक्रवारी कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात ठिय्या मारला. यावेळी सहसंचालक सचिन रावल यांच्या टेबलावर शेतकऱ्यांनी साखर ओतून विविध मागण्या केल्या. यावेळी पी. जी. पाटील व अ‍ॅड. शिंदे म्हणाले, कायद्याने चौदा दिवसांच्या आत एफआरपी देणे बंधनकारक असताना राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांनी तडजोड करून शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती फास लावला. त्यामुळे आज ४५ रुपयांसाठी तिष्टत बसावे लागले आहे. सध्या साखरेचे दर ३८ रुपयांपर्यंत असल्याने कारखानदार मालामाल झाले असून, एफआरपी सोडून आणखी पाचशे रुपये दिले पाहिजे, तर ८.५ टक्के उतारा गृहीत धरून ‘एफआरपी’चे सूत्र तयार झाले पाहिजे. सत्तेमुळे राजू शेट्टी व सदाभाऊ खोत यांची तोंडे बंद झाली आहेत. त्यांनी तडजोड केल्यामुळे आज शेतकऱ्यांवर ही वेळ आली असून, पैशांसाठी शेतकरी तळमळत असताना दोन्ही नेते सरकारच्या पातळीवर तोंडही उघडत नाहीत. त्यामुळे आता त्यांच्या घरांवरच मोर्चा काढणार असल्याचे अ‍ॅड. शिंदे यांनी सांगितले. यावेळी सांगली जिल्हाध्यक्ष महादेव कोरे, आदम मुजावर, टी. आर. पाटील, दिलीप माणगावे, प्रशांत पाटील, बदाम शेलार, प्रकाश चंदूरे, गुणाजी शेलार, हणमंतराव पाटील, विष्णू सणगर, आदी उपस्थित होते. ‘एफआरपी’मधील ४५ रुपये अनुदान मिळावे, यासाठी शेतकरी संघटनेने शुक्रवारी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात ठिय्या मारला. सहसंचालक सचिन रावल यांच्या टेबलावर साखर ओतून सरकारच्या धोरणाचा निषेध केला. यावेळी अ‍ॅड. माणिक शिंदे, पी. जी. पाटील, आदम मुजावर, आदी उपस्थित होते.