Kolhapur News: पत्नीने घेतला चक्क पतीच्या हाताचा चावा, कारण काय? तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 12:38 PM2023-03-28T12:38:18+5:302023-03-28T12:38:44+5:30

पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली

The wife bit her husband's hand, Incidents in Kolhapur | Kolhapur News: पत्नीने घेतला चक्क पतीच्या हाताचा चावा, कारण काय? तर...

संग्रहित छाया

googlenewsNext

कोल्हापूर : घटस्फोटाचा अर्ज न्यायालयात सादर केल्यानंतर पुन्हा समझोत्याने एकत्र राहणाऱ्या पती-पत्नीच्या वादात पत्नीने पतीच्या हाताचा चावा घेतला. याबाबत पतीने सोमवारी (दि. २७) पत्नीच्या विरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. विशेष म्हणजे हे दांपत्य उच्चशिक्षित असून, गाडीवरून कामाच्या ठिकाणी सोडण्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे सातारा जिल्ह्यातील व सध्या संभाजीनगर परिसरात राहणारे हे दांपत्य आहे. या दोघांचा वाद घटस्फोटापर्यंत पोहोचला होता. आयटी कंपनीत काम करणाऱ्या पतीने न्यायालयात केेलेल्या अर्जावर पुन्हा समझोता झाल्याने दोघे एकत्र राहत होते. 

मात्र, फार्मासिस्ट असलेल्या पत्नीने पतीला घरात थांबून कंपनीचे काम करण्याचा आग्रह धरला. तिने आपल्याला कामाच्या ठिकाणी सोडायला आणि घ्यायला यावे यासाठी तिचा तगादा सुरू होता. यावरून सोमवारी सकाळी वाद झाल्यानंतर पत्नीने पतीच्या डाव्या हाताच्या मनगटाचा चावा घेतला. पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: The wife bit her husband's hand, Incidents in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.